आई मी सुंदर दिसतो का?; राहुल गांधींनी सांगितली बालपणातील आठवण

Bharat Jodo Yatra rahul gandhi shares memories when i was child i always ask my mother Sonia Gandhi am i beautiful

काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेनिमित्त तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून ते जम्मू-काश्मीरमध्ये पायी प्रवास करत आहेत. या यात्रेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळतो. पुरुष महिलांसह हजारो तरुण या यात्रेत सहभागी होत आहेत. या यात्रेदरम्यान काल राहुल गांधी यांनी यूट्यूबर समदीश भाटियाला एक मुलाखत दिली, या मुलाखतीत राहुल गांधींनी आई सोनिया गांधी यांच्यासोबतची बालपणातील एक मजेदार आठवण ताजी केली आहे. राहुल गांधींनी सांगितले की, मी लहान असताना आई सोनिया गांधी यांना विचारले होते की, मी सुंदर दिसतो का? यावेळी माझ्या आईने माझ्याकडे पाहत म्हटले की, नाही, तू ठीकठाक दिसतो.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, माझी आई अशीच आहे, आई लगेच आरसा दाखवते, माझे वडीलही असेच होते, माझे संपूर्ण कुटुंब असेच आहे. तुम्ही काही बोललात तर ते तुमच्यासमोर सत्य मांडतात, काहीही अतिशयोक्ती करू सांगत नाहीत. जर आपण काही त्यांनी विचारले तर ते जे काही खरं आहे तेच सांगतात. माझ्या आईनेही मला तू ठीकठाक दिसतोस असे म्हटले. त्यावेळी त्या असं असं म्हणून शकल्या असत्या की, तू खूप देखणा आहेस, कारण तू आमचा मुलगा आहेस. मात्र असं न करता जे खरं आहे ते सांगितलं, त्यामुळे माझ्या डोक्यात ही गोष्ट लहानपणापासूनचं फिट आहे.

धार्मिक विचारांबाबत राहुल गांधी काय म्हणाले?

“नक्कीच, माझा देवावर विश्वास आहे. ज्या देवावर माझी श्रद्धा आहे, त्या देवावर माझा विश्वास आहे. ज्या देवाची रचना दुसर्‍याची आहे त्यावर माझा विश्वास नाही. हे एक अतिशय वैयक्तिक मत आहे. जर तुम्हाला जायचे असेल तर तात्विक बाजूने जा, मी असे म्हणू इच्छितो की, शिव ही एक चांगली कल्पना आहे. आपल्या व्यवस्थेमध्ये शिव ही संकल्पना समजणे खूप कठीण आहे आणि मी त्या दिशेने वाटचाल करेन, शिव हा आत्मा आहे, जो अहंकाराच्या पलीकडील एक विचार आहे.

यावेळी भाजपमधून तुम्हाला कोणी बूट पाठवलेत का असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारण्यात आला, त्यावर राहुल गांधी म्हणाले की, नाही नाही, ते फक्त माझ्यावर बूट फेकतात. पण मी सहसा स्वतःचे बूट स्वतः खरेदी करतो, पण आता आई आणि बहीणही बूट पाठवतात. यात माझे काही राजकारणी मित्रांनाही मला बूट भेट दिले आहेत.

राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रत्येक जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात गर्दी होतोय. याबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, व्यक्तिगत रुपात राजकारण्यांना देव मानण्याची प्रवृत्ती मला आवडत नाही. इतक्या लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत हे जाणून तुम्हाला रात्री चांगली झोप येते का? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, “मी याला आशा म्हणून पाहत नाही, तुम्ही ते आशेच्या रूपात पहा. मी ते नाते म्हणून पाहतो. मला त्यांच्याबद्दल प्रेम आणि जिव्हाळा आहे. आणि माझ्यासाठी त्यांच्या मनातही त्याच भावना आहेत.


माफी मागा, नाहीतर स्वत:लाच जोडे मारा; शिवसेनेची राज्यपालांवर सडकून टीका