जम्मू -काश्मीर पोलिसांचा राहुल गांधींच्या जीवाशी खेळ; सुरक्षा अचानक हटवली, यात्रा स्थगित

bharat jodo yatra suspended for today as congress alleges security breach
काँग्रेसच्या या प्रवासात कोणकोणते पक्ष सहभागी होणार आहेत...जाणून घेऊयात....

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारीपासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा आता शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या या यात्रेचा समारोप जम्मू-काश्मीरमध्ये होणार आहे. मात्र जम्मू-काश्मीरमध्येही या यात्रेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय, मात्र आज काश्मीरमध्ये यात्रा सुरु असताना अचानक राहुल गांदी यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे, या घटनेमुळे यात्रेदरम्यान एकच खळबळ उडाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील जम्मू काश्मीर पोलिसांच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. जम्मू -काश्मीर पोलिसांचा राहुल गांधींच्या जीवाशी खेळ सुरु असल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भारत जोडो यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा आज बनिहालमधून जाणार होती. मात्र बनिहालमध्ये सुरक्षा पुरवण्यास पोलिसांनी चक्क नकार दिला आहे. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राहुल गांधी आजची पुढील पदयात्रा स्थगित केली, उद्या पुन्हा नेहमीप्रमाणे ही पदयात्रा सुरु होणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वत: आजच्या घटनेबाबत माहिती दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, पदयात्रा सुरु होताच मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली. पोलीस सुरक्षा पूर्णपणे हतबल झाली. गर्दीवर नियंत्रण ठेवणारे पोलीस अचानक आजूबाजूला दिसेनासे झाले, यानंतर माझ्या खासगी सुरक्षा रक्षकांनी पोलिसांच्या सुरक्षेशिवाय पुढे जाऊ नये, असा सल्ला दिला. त्यामुळे आम्ही यात्रा पुढे सुरु ठेऊ शकलो नाही. सुरक्षेची हमी देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ती का पार पाडली गेली नाही मला कल्पना नाही. मात्र उद्या आणि परवा असं होऊ नये, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते जम्मू-काश्मीर पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. हे ठिकाणं अत्यंत संवेदनशील आहे. जम्मू-काश्मीर पोलीस राहुल गांधी यांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यांना हे आदेश कुणी दिले? असा तीव्र सवालही काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.


ते माझ्या पक्षाचे नेते नाहीत; राऊतांचा आंबेडकरांवर पलटवार