घरमहाराष्ट्रभारत जोडो यात्रेचे अकोल्यात जंगी स्वागत; महिलांनी राहुल गांधींसमोर मांडल्या व्यथा

भारत जोडो यात्रेचे अकोल्यात जंगी स्वागत; महिलांनी राहुल गांधींसमोर मांडल्या व्यथा

Subscribe

मेडशी गावात 80 टक्के कुटुंबे शेतमजुरी करतात.

गरिबांना स्वस्त धान्य आणि गॅस सिलिंडर मिळायला हवी. मदत मिळायला हवी, नाहीतर आम्ही जगायचे कसे? आमची मुलं कशी शिकणार ?” हा प्रश्न मेडशी इथल्या पद्मिनी सुरेश थोरात यांना पडला आहे. पद्मिनी या शेतमजूर असून त्यांचे शिक्षण झाले नाही. त्याचबरोबर त्यांचा राजकारणातलं फार काही काळात नाही पण राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी त्या उपस्थित होत्या.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. त्यावेळी पद्मिनी थोरात म्हणाल्या रोज दोनशे रुपये हजेरीवर आम्ही शेतात मजुरीला जातो. पण सरकारने आमचे रेशन बंद केले आहे. आता गहू, तांदुळ, ज्वारी सगळ्याचेच दर वाढले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी गळ्यातले सोने तारण ठेवून गॅस सिलेंडर घेतल्याचे सांगितले. स्वस्तात गॅस सिलिंडर मिळेल अशी आशा होती. पण गॅस सिलिंडरचे दर 1200 रुपये झाले आहेत. दिवसभर कष्ट करून रोज दोनशे कमावतो त्यात एवढा महाग गॅस सिलिंडर घेऊ शकत नाही. आता पुन्हा आम्ही चूल पेटवली आहे. म्हणून गरिबांना रेशन आणि गॅस स्वस्तात मिळायला हवा, असे पद्मिनी थोरात म्हणाल्या

- Advertisement -

दरम्यान अकोल्यातील मेडशी गावात अनेक महिलांची अशीच स्थिती आहे. येथील 80 टक्के कुटुंबे शेतमजुरी करतात. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतुन जनतेला भेटत आहेत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. अशातच अकोल्या मधील या महिलांना आशा आहे की राहुल गांधी त्यांचे म्हणणे ऐकून घेतील. भारत जोडो यात्रा बुधवारी रात्री अकोला जिल्ह्यातील पातूर येथे दाखल झाली होती. गुरुवारी सकाळी सहा वाजता पातूर येथून सुरू झालेली यात्रा चेंन्नी फाटा, वाडेगाव येथे दुपारची विश्रांती घेऊन संध्याकाळी वाडेगाव, बाळापूर येथे मुक्कामी पोहोचली.

पातूर येथून पहाटे मोठ्या जल्लोषात पदयात्रेला प्रारंभ झाला. सोलापूर, सांगली, यवतमाळ आणि नागपूर येथील लोक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. दुपारी वाडेगाव मध्ये राहुल गांधींच्या स्वागतासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम पथक आणि देशभक्तीपर गीतांनी राहुल गांधींचे स्वागत केले.

- Advertisement -

वाडेगाव ते बाळापूर दरम्यान दुपारच्या सत्रात बाळासाहेब थोरात व त्यांच्या कन्या जयश्री थोरात पदयात्रेत सहभागी झाले होते. यांच्यासोबतच मेधा पाटकर आणि स्वयंसेवी कार्यकर्त्या पदयात्रेत सहभागी झाले होते. तर सकाळच्या सत्रात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते.


हे ही वाचा –  बदल्यांचे सत्र कायम : राममूर्ती एमएमआरडीएचे सहआयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -