घरमहाराष्ट्रBharatratna: उशीर केला पण, भारतरत्न घोषित झालेली दोन्ही नावं अतिशय योग्य; शरद...

Bharatratna: उशीर केला पण, भारतरत्न घोषित झालेली दोन्ही नावं अतिशय योग्य; शरद पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

पुणे: उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. विरोधकांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. आता यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Bharatratna Belatedly both the names declared Bharatratna are very appropriate Sharad Pawar s reaction)

शरद पवार म्हणाले की, सत्तेचा गैरवापर केला जात आहे. कायदा हाती घेणाऱ्यांना मोकळीक दिली जात आहे. तसंच, जर सरकारची बघ्याची भूमिका असेल तर राज्य कोणत्या दिशेला जातं आहे? असा सवालही शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. तसंच, ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे, त्यावरही प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

शरद पवार म्हणाले की, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर केला होता. त्यानंतर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. भारतरत्न पुरस्कारासाठी करण्यात आलेली निवड ही अतिशय योग्य असल्याचं, ते म्हणाले. केंद्राने थोडा उशीर केला पण योग्य निवड केली, असं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत. ही चांगली बाब आहे. महाराष्ट्रातील लोकांसंबंधी त्यांची आस्था वाढत आहे, असं दिसते. माझी मागणी आहे की, गुजरातला ते गेल्यानंतर काहीतरी देण्याबाबतचे औदार्य दाखवतात, तसं त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर काहीतरी देण्याची घोषणा केली तर माझ्यासह राज्यालाही आनंद होईल, अशी टीका शरद पवार यानी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर केली.

- Advertisement -

सत्तेचा गैरवापर

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेने यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, आदिवासी बहुल असलेल्या राज्याचे ते मुख्यमंत्री होते. आदिवासी नेत्याबद्दल दिल्लीमधील प्रशासन अशी भावना ठेवत असेल तर ते योग्य नाही. सोरेन यांनी झारखंडमध्ये जी धोरणं राबवली ती पाहण्यासाठी दिल्ली आणि देशाबाहेरील जाणकार प्रशासकही येतात, असं असताना सोरेन यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करून आत टाकले, हे काही योग्य नाही, सत्तेच्या गैरवापराला आज काही मर्यादा राहिली नाही.

( हेही वाचा: Supriya Sule : केंद्र सरकारने राज्य सरकार बरखास्त करावं, सुप्रिया सुळे यांची मागणी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -