…तर बापाच्या जागी बाळासाहेबांचं नाव लावा, बंडखोर आमदारांना भास्कर जाधव यांचं आव्हान

या मेळाव्याला बबन थोरात आणि भास्कर जाधव उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधव आणि बबन थोरात यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

bhaskar-jadhav

हिंगोली – शिवसेनेसोबत गद्दारी करून शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करणाऱ्या गद्दारांनी त्यांच्या बापाच्या जागेवर बाळासाहेबांचं नाव वापरावं असं आव्हान शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे. हिंगोलीमध्ये आयोजित केलेल्या शिवसेनेच्या महामेळाव्यात ते बोलत होते.

हेही वाचा – राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, भास्कर जाधव स्पष्टच बोलले

हिंगोलमध्ये शिवसेनेच्या वतीने महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. या मेळाव्याला बबन थोरात आणि भास्कर जाधव उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधव आणि बबन थोरात यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

हेही वाचा – शिवसेनेची पुनर्बांधणी! अरविंद सावंत आणि भास्कर जाधव पक्षनेतेपदी, तर सचिवपदी पराग डाके

भास्कर जाधव म्हणाले की, “बंडखोर आमदार बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत आहेत. त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत विचारणा केली असता भाजपची काही चाणक्य मंडळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे नेते आहेत, ते राष्ट्रीय नेते आहेत, असं वारंवार सांगत आहेत. तुम्ही एवढेच प्रमाणिक आहात, तर बापाच्या जागेवर बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावा. आम्हाला वाईट वाटणार नाही, आम्हालाही तुमची निष्ठा बघायची आहे. केवळ पाप लपवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला जातो.”