Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी 'दिल्ली'वारीबद्दल भास्कर जाधवांनी केली इच्छा व्यक्त; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

‘दिल्ली’वारीबद्दल भास्कर जाधवांनी केली इच्छा व्यक्त; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सुनील तटकरे यांना त्यांना मिळालेल्या 'दिल्ली'च्या संधीवरुन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर भास्कर जाधव यांनी दिल्लीवारीबाबत वक्तव्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सुनील तटकरे यांना त्यांना मिळालेल्या ‘दिल्ली’च्या संधीवरुन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर भास्कर जाधव यांनी दिल्लीवारीबाबत वक्तव्य केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भास्कर जाधवांना थेट दिल्लीची म्हणजेच कोकणातून खासदारकी लढवण्याची ऑफर दिली. (bhaskar jadhav compare himself with sunil tatkare supriya sule said you should also contest lok sabha elections from konkan)

नेमके काय म्हणाले भास्कर जाधव?

- Advertisement -

“राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि माझा आतापर्यंतचा प्रवास सारखाच राहिला आहे. आमचा पाठशिवणीचा खेळ आहे. तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष, मी विरोधी पक्षनेता, तुम्ही आमदार, मी आमदार, तुम्ही मंत्री मी मंत्री, तुम्ही पालकमंत्री, मी पालकमंत्री, इथपर्यंत आपण आलो आहोत. तुम्ही विधानपरिषद मी विधानपरिषद. पण आता दिल्लीत जाण्याचा रस्ता बंद आहे. आजच्या घडीला व्यासपीठावरचे चित्र बघितले तर मला संधी नाही. पण दादा म्हणाले, सुनील तटकरेंना महाराष्ट्रात बोलवा, भास्कर जाधव यांना दिल्लीत पाठवा असे मी म्हणत नाही, तटकरेंना दिल्लीसाठीच्या शुभेच्छा देतो”, अशी टोलेबाजी भास्कर जाधव यांनी केली.

दरम्यान, भास्कर जाधव यांनी दिल्लीबाबत इच्छा व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भास्कर जाधव यांना खासदारकी लढवण्याची ऑफर दिली. “कोकणातून दोन खासदार येतात. त्यामुळे भास्कर जाधव तुम्ही मनावर घेत असाल तर तसा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीत मांडण्यात येईल. दिल्लीला येण्यासाठी कोणी इच्छुक नसतं, मात्र भास्कर जाधव यांनी इच्छा व्यक्त केलीय त्यामुळे कौतुक आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

“सध्या विधीमंडळात मोठ्या अडचणी आहेत. विधीमंडळातील व्यासपीठ हे वैयक्तिक बाबीसाठी मांडायचे नसते. मात्र, अध्यक्ष आता खुर्चीवर येऊन बसतात आणि सत्ताधारी पक्षाचा व्यक्ती आल्यानंतर इशारा करतो आणि मग बोलायला सुरुवात होते. सभागृहाचा दुरुपयोग होतो आहे. जयंत पाटील संयमी व्यक्ती आहे. मात्र त्यांना देखील आक्रमक व्हावे लागले आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. खरंतर कारवाई माझ्यावर व्हायला हवी होती. मात्र कारवाई त्यांच्यावर केली. खरंतर सभागृहात ज्याचा माईक सुरु असतो त्याचे भाषण ग्राह्य धरले जाते. जयंत पाटील यांचा माईक बंद होता तरीदेखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली”, असेही भास्कर जाधव यांनी सांगितले.


हेही वाचा – पुढील ८ दिवस घराबाहेर पडू नका; शरद पवारांना डॉक्टरांचा सल्ला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -