घरमहाराष्ट्रBhaskar Jadhav : ...काँग्रेस आपला वापर करत नाही ना? भास्कर जाधवांचा सवाल

Bhaskar Jadhav : …काँग्रेस आपला वापर करत नाही ना? भास्कर जाधवांचा सवाल

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या जागावाटपावर चर्चा सुरू आहेत. विदर्भातील जागा लढण्यासाठी काँग्रेस आपला वापर करत नाही ना, असा सवाल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे गटाची मातोश्री निवासस्थानी झालेल्य बैठकीत भास्कर जाधव आक्रमक झाले होते. ठाकरे गटाने विदर्भातील रामटेक आणि चंद्रपूर लोकसभा जागा लढवल्या पाहिजे, अशी मागणीही भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंकडे केली.

भास्कर जाधव म्हणाले, “शिवसेनेने विदर्भातील रामटेकसह चंद्रपूर लोकसभा जागा आपण लढवल्या पाहिजे. विदर्भातील जास्त जागा काँग्रेसला न देता आपण देखील तिथे लढले पाहिजे. विदर्भात लढण्यासाठी काँग्रेस आपला वापर करत नाही ना?, सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ये तो होना ही था…

यापूर्वी लोकसभेच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या दोन वेळा बैठका झाल्या आल्या आहेत. पण अद्यापही महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. यात भास्कर जाधव यांच्या वक्तव्याचे महाविकास आघाडीवर काय परिणाम पडतील. हे येत्या काळात कळेलच.

- Advertisement -

हेही वाचा – PM Modi : “डॉ. मनमोहन सिंग हे मतदानासाठी आले नाहीत पण…”, पंतप्रधान मोदींकडून कौतुक

उद्धव ठाकरेंवर काही परिमाण होणार नाही – फडणवीस

भाजपाला संपवण्यासाठी काँग्रेसला आपला वापर करू देऊ नका, असे विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर केल आहे. याव देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, “आजपर्यंतचा माझा अनुभव आहे, उद्धव ठाकरेंसमोर कोण काय बोलले, तरी त्याच्यावर फार परिमाण होतो, असे मला वाटत नाही.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -