घरमहाराष्ट्र...पण शेवटी ते शिपाईच राहिले, भास्कर जाधवांचा राणेंवर प्रहार

…पण शेवटी ते शिपाईच राहिले, भास्कर जाधवांचा राणेंवर प्रहार

Subscribe

एक पुढचं आणि एक मागचं एक तोंड, सारखं असं सुरू असतं. याला अक्कल नाही, त्याला अक्कल नाही. त्याची औकात नाही, याला काय कळतंय, त्याला काय कळतंय. हे अकलेचे कांदे, कोंबडीवाला, असं म्हणत भास्कर जाधवांनी प्रहार केलाय.

मुंबईः शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या मंचावरूनच केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा नाव न घेता जोरदार समाचार घेतलाय. एवढा शिवसेनाप्रमुखांनी त्यांना मोठे केले, पण शेवटी ते शिपाईच राहिले. याची कुंडली माहीत आहे, त्याची कुंडली माहीत आहे, मला तोंड उघडायला लावू नका, अरे खरंच त्यांचं तोंड इतकं घाणेरडं आहे की त्यातून चांगलं निघतच नाही, असं म्हणत भास्कर जाधवांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. भास्कर जाधवांनी शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला उपस्थिती लावलीय, त्यावेळी ते बोलत होते.

खरंतर कोंबडीवाल्याचा आज समाचार घ्यायचा आहे, शिवसेना सोडल्यानंतर त्यांची पुढची टोकं तुटून गेलेली आहेत. पण कोंबडीला दोन तोंडं असतात, आपल्या घराघरात कोंबड्या आहेत, आहेत की नाही. एक पुढचं आणि एक मागचं एक तोंड, सारखं असं सुरू असतं. याला अक्कल नाही, त्याला अक्कल नाही. त्याची औकात नाही, याला काय कळतंय, त्याला काय कळतंय. हे अकलेचे कांदे, कोंबडीवाला, असं म्हणत भास्कर जाधवांनी प्रहार केलाय.

- Advertisement -

याची कुंडली माझ्याकडे आहे, त्याची कुंडली माझ्याकडे आहे. अरे तुम्ही इन्कम टॅक्समध्ये शिपाई होता, तेव्हा लोकांच्या फायली जपून ठेवायचात. एवढा शिवसेनाप्रमुखांनी त्यांना मोठा केला, पण शेवटी ते शिपाई ते शिपाईच राहिले. याची कुंडली माहीत आहे, त्याची कुंडली माहीत आहे, मला तोंड उघडायला लावू नका, अरे खरंच त्यांचं तोंड इतकं घाणेरडं आहे की त्यातून चांगलं निघतच नाही. भाजपाचे लोक त्यांना खांद्यावर घेऊन नाचत आहेत. उद्धव ठाकरेंवर दुगाण्या घालतायत. १८ वर्षे शिवसेना सोडून झाली. मी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना संपली, अशी टीका त्यांनी केली. मला देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारायचा आहे. हेच भारतीय जनता पक्ष हा लुटारू, चोरांचा, बलात्काऱ्यांचा, दारूवाल्यांचा, मटकेवाल्यांचा पक्ष असल्याचं राणेंनी सांगितलं होतं. आता तुमच्याकडे आल्यानंतर ते सज्जन झाले काय?, असा सवालही भास्कर जाधवांनी उपस्थित केलाय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -