घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांनी रायगड द्यावा, मग मी ताकद दाखवतो, भास्कर जाधवांचे सुनील तटकरेंना ओपन...

मुख्यमंत्र्यांनी रायगड द्यावा, मग मी ताकद दाखवतो, भास्कर जाधवांचे सुनील तटकरेंना ओपन चॅलेंज

Subscribe

महाराष्ट्रात मला काम करण्यासाठी कोणत्या जिल्ह्याची निवड करायची तर मी रायगड जिल्ह्याची निवड करेन. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मला संघटनात्मक काम करण्यासाठी रायगड जिल्हा दिला तर मी माझी ताकद दाखवतो, असा इशारा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी खासदार सुनील तटकरे यांचा नामोल्लेख न करता दिला आहे. खासदार तटकरे हे कोकणचे भाग्यविधाते नाही, तर सगे सोयरे कुटूंबियाचे भाग्यविधाते आहेत, अशा शब्दात बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली. तळा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान ते बोलत होते.

शिवसेना हा पक्ष नसून संघटना म्हणून मोठी ताकद आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण शिवसेना करते. शिवसेनेने १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध निवडून येणे ही विजयाची नांदी आहे. उरलेल्या १२ जागांवर विजय होणार असून ४ जागांवर होत असलेल्या उमेदवारांना विजयी करून नगरपंचायतीवर भगवा झेंडा फडकवावा असेही आवाहन त्यांनी केले. विजयी सभेला आमंत्रीत केले तर जरूर येईन असेही ते म्हणाले.

- Advertisement -

भाजप बांडगुळासारखा पक्ष आहे. भाजप हा शिवसेनेच्या ताकदीवर वाढणारा पक्ष आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत शिवसेनेने भाजपला मोठे केले. आणि भाजपने गद्दारी केली. याचा अर्थ छुप्या पध्दतीने भाजप खंजीर खुपसते. भाजप लबाड पक्ष आहे अशी जहरी टीका आमदार गोगावले यांनी केली. खासदार सुनील तटकरे स्वतःला कोकणचे भाग्यविधाते म्हणवितात. मग त्यांना घरोघरी जाऊन मते मागण्याची वेळ का येते? असाही सवाल त्यांनी केला. तुम्ही जर जनतेची कामे केली असतील, तर जनता तुम्हाला निवडून देईल. परंतु केवळ आश्वासन देऊन मते मिळत नाहीत. त्यासाठी जनतेची कामे करावी लागतात, असाही टोला आमदार गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना लगावला.


हेही वाचा : IND vs SA ODI Series: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाने फक्त एकदाच जिंकली वनडे मालिका, जाणून घ्या कुठे आणि कधी?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -