घरताज्या घडामोडीशिवसेनेनं वनमंत्रिपद सोडून अध्यक्षपद घेऊ नये, विधानसभा अध्यक्षपदावर भास्कर जाधव यांचे वक्तव्य

शिवसेनेनं वनमंत्रिपद सोडून अध्यक्षपद घेऊ नये, विधानसभा अध्यक्षपदावर भास्कर जाधव यांचे वक्तव्य

Subscribe

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन शिवेसना नेते आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी चांगलाच गाजवलय, सभागृहाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजादरम्यान भाजप आमदारांनी गदारोळ केल्यामुळे १२ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदी भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनाही भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष व्हावं असं एकमत झाले आहे. यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेनं वनमंत्रिपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचंही नाव आलं आहे. भास्कर जाधव यांनी या सगळ्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव यांनी म्हटलंय की, महाविकास आघाडीमध्ये कोणाला काय द्यावं, कोणाला कुठे बसवायचं हे तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ठरवायचं असतं. परंतु शिवसनेनं विधानसभा अध्यक्षपदासाठी वनमंत्री पद सोडू नये यावर मी ठाम असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसनेनं वनखातं ठेवावे शिवसेनेकडे कुठलेही महत्त्वाचे खातं नाही आहे त्यामुळे मंत्रिपद सोडून अध्यक्षपद घेऊ नये असं माझे वैयक्तिक मत असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाच्या ठरावादरम्यान राडा

विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजादरम्यान सभागृहात ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत ठराव करण्यात आला हा ठराम मांडताना सभागृहात भाजप आमदार आक्रमक झाले होते. एका सदस्याने चेंबरमध्ये घुसून माईक ओढला तर एका सदस्याने राजदंड उचलला होता. यानंतर काही आमदार घोळका करुन विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात आले आणि आपल्याला शिवीगाळ केली असल्याचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले यानंतर ठराव करुन भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -