शिवसेनेला संपवण्यासाठी शिंदेंना लढवतायत, शिवसेना रक्तपात होऊन संपेल – भास्कर जाधव

एकनाथ शिंदे तुम्हाला हे शिवसेना विरुद्ध शिवसेना असे लढवत आहेत. शिवसेनेचे रक्तपात होईल शिवसेना संपेल. तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री झाला म्हणून आनंद व्यक्त करतो. पण शिवसेना कशी वाचवायची यासाठी तुम्ही दोन पाऊले मागे या आणि शिवसेना वाचवा

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन करताना भाजपवर चांगलेच संतापले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सरकार बहुमताने आलं असून त्याच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना भास्क जाधवांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपचा एक कलमी कार्यक्रम हा शिवसेना संपवण्याचा आहे. शिंदेंद्वारे शिवसेनेत लढाई सुरु केली आहे. या लढाईमध्ये शिवसेना संपेल, शिवसेनेत रक्तपात होईल, शिवसेना वाचवण्यासाठी परत या असे आवाहन भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर घणाघात केला आहे. विधानसभा सभागृहात भास्कर जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही सांगतात की मी शिवसेनेचा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगायचे आहे. मुख्यमंत्री झालात तुमच्यावर जबाबदारी आली आहे. आपण शिवसेना प्रमुखांचे नाव घेताल शिवसैनिक आहात. तुमची माझी उठबस झाली नाही. दोन टर्म समोरासमोर येत होतो. तिरकी मान करुन चालता, पुन्हा शिवसेनामध्ये आल्यावर गटनेते पदी निवड झाल्यावर सत्कार केला. नंदनवन बंगल्यावर दोन वेळा, एमएसआरडीसीमध्ये दोन वेळा भेट झाली. मंत्रालयात कधी भेट झाली नाही. कोकणात जेव्हा पूर आला तेव्हा खऱ्या अर्थाने शिवसैनिक आणि वारसदार दिसला असे भास्कर जाधव यांनी शिंदेंच्या अभिनंदन प्रस्ताववर म्हटलं आहे.

शिवसेनेत कोण कोणाविरुद्ध लढणार

तुमचा माझा संबंध आला नाही. प्रत्येकाला मदत करण्यासाठी धावून जाता ही वस्तुस्थिती आहे. निवडणुकीवेळी भेटलो नाही आणि बोललो नाही. आपले काम पाहिले आहे. बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे नाव घेता फार मोठी जबाबदारी आहे. एका बाजूला ४० आमदार उभे आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार उभे आहेत. कोण कोणाच्या विरोधात लढणार आहे. कोण कोणाला घायाळ करणार आहे. कोण कोणाला धारातीर्थी पाडणार आहे. याचा विचार करा, माणसाने एकदा लढा पुकारला आणि लढाई लढण्यापूर्वी मला थांबायचे कुठे आहे. हे ज्याला कळतं तोच खरा योद्धा आहे. महाराष्ट्रात पुन्हा महाभारताची, रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे. सख्खे भाऊ विरोधात उभे राहणार आहेत आणि मारणार आहेत. दिल्लीच्या बादशाहासाठी महाराष्ट्रात लढत आहात.

भाजपचा सतत महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न

तुमची प्रत्येक चाल सरकार उलथवून टाकण्यासाठी होती. कोरोना संकट असताना महाराष्ट्र बाहेर कसा काढायचा यासाठी प्रयत्न सुरु होते. परंतु प्रत्येक कृती विरोधातली होती. सकाळी सरकार पडेल, पंधरा दिवस, आता पडेल नंतर पडेल अशी तुमची कृती होती. कधी एकाच्या हातात भोंगा दिला, हनुमान चालीसा, सुशांत सिंह राजपूत आणला, नुपूर शर्मा आणि अनेक गोष्टी केल्या परंतु सत्ता उलटली नाही. ज्या भाजपच्या हिंदुत्वाच्या गोष्टी तुम्ही करत आहात. माझे मित्र दादा इथे बसले आहेत. संजय राठोड इथे आहेत त्यांचे मंत्रिपद घालवण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले. प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांच्यावर ईडीची चौकशी लागली. नियती कोणाला सोडत नाही त्यांच्या घराखाली केंद्र सरकारची सुरक्षा लावावी लागते हा नियतीचा न्याय आहे.

शिवसेनेत रक्तपात होईल

एकनाथ शिंदे तुम्हाला हे शिवसेना विरुद्ध शिवसेना असे लढवत आहेत. शिवसेनेचे रक्तपात होईल शिवसेना संपेल. तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री झाला म्हणून आनंद व्यक्त करतो. पण शिवसेना कशी वाचवायची यासाठी तुम्ही दोन पाऊले मागे या आणि शिवसेना वाचवा. यांचा २५ वर्षांचा एक कलमी कार्यक्रम हा शिवसेना संपवण्याचा आहे. तुमच्याबद्दल यांना काही प्रेम आले नाही असे अनेक उदाहरण तुम्हा सांगू शकतो असे शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले आहेत.


हेही वाचा : सर्वगुणसंपन्न शिंदेंसारख्या नेत्याला एकच खातं का दिलं? अजित पवारांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न