घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021: नितेश राणेंना निलंबित करा, सभागृहात हात जोडून...

Maharashtra Assembly Winter Session 2021: नितेश राणेंना निलंबित करा, सभागृहात हात जोडून माफी मागायला लावा – भास्कर जाधव

Subscribe

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात भाजप आमदार नितेश राणेंनी एक आवाज काढत त्यांना डिवचले होते. त्यामुळे आता शिवसेना आणि राणे यांच्यामध्ये वादंग निर्माण झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंबाबत नितेश राणे पुन्हा बोलले. नेत्यांबद्दल बोलतांना त्यांनी मान राखला पाहीजे होता, असं आमदार सुहार कांदे म्हणाले. त्यानंतर हाच मुद्दा सभागृहात आमदार भास्कर जाधव यांनी उचलून धरला असता नितेश राणेंना निलंबित करा, अशी मागणी भास्कर जाधवांनी केली.

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव सभागृहात बोलताना म्हणाले की, या सभागृहाची चर्चो प्रतिष्ठा राखण्याचा विषय आज तीन वेळा आलाय. दोन ते तीन दिवसापूर्वी मी सभागृहामध्ये वस्तूनिष्ठ अंगविक्षेप केले. त्यानंतर भास्कर जाधवांना निलंबित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली असता संपूर्ण सभागृहात गोंधळ पहायला मिळाला. त्यानंतर सभागृहात मी माफी देखील मागितली. विधिमंडळाच्या तिसऱ्या दिवशी मी सभागृहात उपस्थित नव्हतो. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विधीमंडळाच्या आवाराबाहेर विरोधकांकडून पायऱ्यांवर निषेध वर्तवला जात होता. परंतु भाजपच्या आमदारांनी सरकारचं लक्ष वेधताना आदित्य ठाकरेंविरोधात एक आवाज काढला. त्यासंदर्भात सुनील प्रूभूंनी मु्द्दा उपस्थित केला. मी सभागृहामध्ये नव्हतो. परंतु ती सर्व क्लिप मी बघितली. त्याचवेळी विरोधी पक्षातील नेत्यांकडून सुनील प्रभूंच्या एक गोष्ट लक्षात आणून दिली. ती म्हणजे, आपाकालीन सभापती भास्कर जाधवांनी सांगितलं की, सातत्याने अशा पॉइंट ऑफ ऑर्डर काढू नका. खरं तर मी पॉइंट ऑफ ऑर्डर न बोलता पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोललो होतो.

- Advertisement -

नितेश राणेंना निलंबित करा

काळ कशामुळे सोकावला याचं कारण मी सभागृहात सांगणार आहे. मागील अधिवेशनात ५ जुलै रोजी भाजपचे १२ आमदार निलंबित झाले. त्यानंतर योगायोगानं त्या चेअरवर मी होतो. विधानसभेच्या पायऱ्यांवर देवेंद्र फडणवीसांनी अभिरूप विधानसभा भरवली होती. त्यावेळी याच सदस्यांनी एक वक्तव्य केलं होतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना उद्देशून बोलल्याची एक क्लिप आहे. तसेच या संधीची मी वाट पाहत होतो. दादा मी येथे असंसदीय शब्द बोलतो. भास्कर जाधव म्हणजे काय? त्याला कोणीतरी सांगितलं दोन बिस्कीटं देतो. जा त्याला चावून ये. तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, असं नितेश आमदार त्या क्लिपमध्ये बोलले होते. परंतु आज मला दादा, देवेंद्र फडणवीस आणि माजी अध्यक्ष नानांना प्रश्न विचारायचा आहे की, जर मला दोन बिस्किटं घालून मला कोणालातरी चावायला सांगितलं आणि मी कुत्रा असेन तर मी असं म्हणणार नाही. परंतु त्याचवेळी दादांनी नितेश राणेंना विचारलं पाहिजे होतं की, जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार भांडत होते. तेव्हा तात्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी १९ जणांना निलंबित केलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली होती. हे दादांनी विचारलं पाहीजे होतं. परंतु नितेश राणेंना निलंबित करा अन्यथा त्यांना सभागृहात हात जोडून माफी मागायला लावा, असं भास्कर जाधव म्हणाले.

चुकाली माफी नाही – सुनील प्रभू

नितेश राणेंच्या निलंबनावरुन विधानसभेत गदारोळ पहायला मिळाला. याबाबत आमदार सुनील प्रभूंनी देखील सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत एक नियम तयार करणं गरजेचं आहे. दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी सदनामध्ये कोणाचीही टिंगळटवाळी करू नये. आपण कोणाविरूद्ध बोलू नये. तसेच आपण आचारसंहिता पाळली पाहीजे. या दोन्ही गोष्टीनंतरही सदस्य नितेश राणेंकडून मी बोलणार असं सांगितलं जातं. याचा अर्थ तुमच्या देखील नेत्याचा अवमान ते करतात. चुकाली माफी नाही. काळ सोखाळत आहे हे विधीमंडळाचं सभागृह आहे. या सभागृहातून एक विशिष्ट प्रकारची प्रतिमा लोकांपर्यंत जाते. त्यामुळे अशा प्रकारे वारंवार समज देऊन देखील अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा चुकीची भाषा करणाऱ्या सदस्याला निलंबित करा अशी माझी मागणी आहे, असं सुनील प्रभू म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021: कालीचरण महाराजावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नवाब मलिकांची मागणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -