Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र "रस्ता तुमच्या मालकीचा आहे का?", भास्कर जाधव बारसूमध्ये पोलिसांवर संतापले

“रस्ता तुमच्या मालकीचा आहे का?”, भास्कर जाधव बारसूमध्ये पोलिसांवर संतापले

Subscribe

उद्धव ठाकरे हे बारसूमध्ये जाणार त्यामुळे भास्कर जाधव हे सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहित बारसू येथे दाखल झाले. पण यावेळी पोलिसांनी त्यांची गाडी आत सोडल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीला आत सोडण्यापासून रोखले.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसू सोलगावमधील नागरिकांची भेट घेण्यासाठी सोलगावमध्ये दाखल झालेले आहेत. पण त्याआधी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या ताफ्याला या गावात जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर भास्कर जाधव हे संतापलेले पाहायला मिळाले. रस्ता तुमच्या मालकीचा आहे का? असा थेट प्रश्न विचारत भास्कर जाधव यांनी आपला राग व्यक्त केला. तर माझ्याशी अशा अहंकाराच्या भाषेत बोलू नका, असेही यावेळी जाधव यांच्याकडून पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे बारसू येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा – “शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही..”, सत्ताधाऱ्यांवर राऊतांची खोचक टीका

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे बारसूमध्ये जाणार त्यामुळे भास्कर जाधव हे सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहित बारसू येथे दाखल झाले. पण यावेळी पोलिसांनी त्यांची गाडी आत सोडल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीला आत सोडण्यापासून रोखले. यानंतर संतापलेल्या भास्कर जाधव यांनी पोलिसांची कानउघडणी केली. तसेच सत्ताधाऱ्यांवर देखील निशाणा साधला.

रस्ता तुमच्या मालकीचा आहे का?
बारसू येथे पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांची गाडी रोखल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये वाद झाला. यावेळी भास्कर जाधव पोलिसांवर संतापत म्हणाले की, कारण नसताना गाड्या का थांबवल्या असे जाधव यांनी विचारताच परवानगी घेऊन या असे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले. तर कारण नाही, अशी भाषा माझ्यासोबत नका वापरू. तुम्हाला गाड्या आत न सोडण्याासाठी पोलिसांनी काय लिहून दिले आहे ते दाखवा. तुमची या ठिकाणी नेमणूक आहे म्हणून तुमच्यासोबत बोलत आहे नाही तर तुमच्याशी बोलण्याची गरद काय होती, असे जाधवांनी पोलिसांना सुनावून दाखवले. घमेंडी आणि दादागिरीमध्ये बोलण्यापेक्षा सौजन्यामध्ये बोला, असेही यावेळी जाधव यांनी पोलिसांना सांगितले.

- Advertisement -

पोलिसांच्या अंगावर वर्दी चढली की नशा चढते…
पोलिसांशी झालेल्या वादावर भास्कर जाधव यांनी प्रसार माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, पोलिस हे वरून आलेल्या नियमांप्रमाणे वागत असतात. पण कधी कधी ते अतिशयोक्ती देखील करतात. त्यांना जे सांगितलेले असते त्या पलिकडे त्यांना काही तरी वेगळा हक्क आहे, असे समजतात. प्रत्येक क्षेत्रात पोलिसांना अमर्याद अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ते बोलतील तो कायदा आणि बोलतील तो नियम. अनेकदा अधिकारी हे स्थानिक नसल्याने ते विचारत नाहीत किंवा बोलत नाहीत. त्यांच्या अंगावर एकदा वर्दी चढली की त्यांना नशा चढते, असे भास्कर जाधव यांच्याकडून पोलिसांना सुनावण्यात आले.

- Advertisment -