राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर भास्कर जाधवांची टीका, म्हणाले…

bhaskar-jadhav

राज्यपाल भगतसिंह कोश्यारीच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राज्यपालांवर टीका केली जात आहे. दरम्यान शिवसेना आमदार भास्करराव जाधव यांनीही राज्यपालांवर टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांचा घरगडी असा उल्लेख केला आहे.

भगतसिंह कोश्यारींच्या महाराष्ट्राच्या विरोधातील वक्तव्यावरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी संजय राऊत यांना अटक केल्याचीही टीका भास्कर जाधव यांनी केली. ते चिपळून येथे बोलत होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. तर संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर टिपण्णी केली.

मंत्रीमंडळ विस्तारावर टीका – 

भास्कर जाधव यांनी राज्य मंत्री मंडळाच्या विस्तारावर टीका केली. ते म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊच नये. त्याची गरजच नाही.. आता लोकांना लोकशाही काय आहे, ते समजले. आता बिनखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचेच राबवत आहेत. म्हणून मंत्रीमंडळाचा विस्तार न होता भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम राबवला जावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत.

लोकसभेच अधिवेशन सुरूत राऊत यांना अटक –

भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्रविरोधी वक्तव्यावरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी संजय राऊत यांना अटक केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना संजय राऊत यांनी पत्र लिहिले होते. पाच ऑगस्टपर्यंत ईडीकडे त्यांनी वेळ मागितला होता. अधिवेशन संपल्यानंतर सात ऑगस्ट रोजी हजर राहतो, असे सांगितले होते. पण राऊतांच्या पत्राला कोणतंही उत्तर न देता, लोकसभेच अधिवेशन सुरू असताना संजय राऊत यांना ईडीने अटक केली, असा आरोप भास्कर जाधवांनी केला.