भातसा धरणाची पाणीपातळी १३४ मीटर; सापगाव आणि नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

भातसा नदीच्या काठावरील विशेषतः शहापूर- मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.

lake- monsoon

साधारणपणे जून महिन्यात पावसाचे आगमन होते. पण जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. पण गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातच पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाने केलेलया दमदार बॅटिंग मुळे राज्यात काही भागांमध्ये पूर परिस्थिति सुद्धा निर्माण झाली. पण अशातच पाणीपुरवठा करणारी धरणे सुद्धा पाण्याने भरली आहेत. अशातच भातसा धरणाची पाणी पातळी सुद्धा वाढली आहे. भातसा धारण क्षेत्रात सुद्धा पावसाचे प्रमाण वाढत आहे.

हे ही वाचा –  पावसाच्या दमदार हजेरीमुळे तानसा आणि तुळशी तलावाच्या पाणीपातळीत वाढ, मुंबईकरांच्या पाणीकपातीचे…

आज सायंकाळी ५.०० वाजता भातसा धरणाची पाणी पातळी १३४. ०८ मी. एवढी असून भातसा धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य पाण्याचा वेढा थोडा वाढला आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परीचलन सुचीनुसार नियमित करणेसाठी, भातसा धरणाची वक्रद्वारे येणाऱ्या काही दिवसात उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामस्वरूप भातसा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग प्रवाहीत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भातसा नदीच्या काठावरील विशेषतः शहापूर- मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा – भायखळ्यातील शिवसैनिकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे उद्धव ठाकरे संतापले, पोलिसांना विचारला जाब

सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत एकूण ९,५२,५५० दशलक्ष लिटर (६५.८१ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील ८ महिने म्हणजेच २४७ दिवस म्हणजेच पुढील १७ मार्च २०२३ पर्यंत पुरेल इतका आहे. सात तलावांपैकी मोडक सागर गुरुवारपासूनच भरून वाहू लागला आहे. तर तानसा व तुळशी तलाव कोणत्याही क्षणी भरून वाहू लागणार आहे. तर उर्वरित तलावांपैकी मध्य वैतरणा तलावात १,२५,२९६ दशलक्ष लिटर (६४.७४ टक्के)इतका पाणीसाठा आहे. तर भातसा तलावांत ४,२५,९१४ दशलक्ष लिटर (५९.४० टक्के) इतका पाणीसाठा, विहार तलावांत १६,४९७ दशलक्ष लिटर (५९.५६ टक्के) पाणीसाठा जमा आहे. तसेच, अप्पर वैतरणा तलावांत १,२२,५६९ दशलक्ष लिटर ५३.९८ टक्के) इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. त्यामुळे उर्वरित चार तलावांत ५० टक्केपेक्षाही जास्त पाणीसाठा जमा झालेला असल्याचे समोर येते.

हे ही वाचा –  पालिकेच्या योजनांना यश! हिंदमाता, किंग्ज सर्कलमध्ये यंदा पाणी साचलं नाही