भाऊ चौधरींची हकालपट्टी.., खासदार संजय राऊतांची ट्विट करून माहिती

शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे. भाऊ चौधरी हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

संजय राऊतांनी ट्वीट करत म्हटले आहे की, शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे, असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर भाऊ चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.

भाऊ चौधरी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख होते. तसेच ते संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. संजय राऊत यांच्या कोर्ट कामकाजातील क्रमांक एकची व्यक्ती म्हणून भाऊ चौधरी यांच्याकडे बघितले जात होते. संजय राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.

नाशिकमधून ठाकरे गटाच्या बारा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटात खळबळ उडाली होती. नाशिकला शिंदे गटाने सुरुंग लावत ठाकरेंना धक्का दिला होता. त्यानंतर नाशिकची संपर्कप्रमुख जबाबदारी भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे होती. परंतु त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्काच समजला जात आहे.


हेही वाचा : आधी राजीनामा द्या नंतर काय घाण करायची ती करा, राज ठाकरेंची मनसे नेत्यांना