घरताज्या घडामोडीभावना गवळींविरोधात ईडीचा फास आणखी घट्ट, संचालक सईद खानला अटक

भावना गवळींविरोधात ईडीचा फास आणखी घट्ट, संचालक सईद खानला अटक

Subscribe

मनी लाँडरिंग प्रकरणात सईद खानला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भावना गवळींच्या संस्थेवर ईडीने छापेमारी केली होती. गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये बदल करुन कंपनीत रुपांतर केल्याप्रकरणी संचालक सईद खानला ईडीने अटक केली आहे. सईद खानच्या अटकेनंतर आता भावना गवळींना चौकशीला बोलवण्यात येण्याची शक्यता आहे. भावना गवळींच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडीने छापेमारी केली होती. या शिक्षण संस्थांमधून पाच कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार भावना गवळी यांनी केली होती. त्यावरुन भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली होती. सोमय्यांच्या दौऱ्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ईडीने या पाच संस्थांवर छापेमारी केली होती.

वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाला ईडीकडून अटक झाली आहे. महिला उत्कर्ष प्रताष्ठानमध्ये बदल करुन त्याचे कंपनीत रुपांतर केल्या प्रकरणी कंपनीचा संचाल सईक खान याला ईडीने सोमवारी रात्री ८ च्या सुमारास अट केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात सईद खानला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

भावना गवळींवर आरोप काय?

खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीने छापेमारी केली होती. गवळी यांच्या ट्रस्टमध्ये १७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी ईडीने तपास सुरु केला आहे. कथित गैरव्यवहार प्रकरणी भावना गवळी यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी तक्रार केली होती. बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डानं ४३.३५ कोटी रुपयांचे कर्ज एनसीडीसीकडून कर्ज घेतलं आहे. परंतु ही कंपनी सुरुच झाली नसल्याचा आरोप हरिष सारडा यांनी केला आहे. तसेच भावना अॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीने वेगवेगळ्या बँकांमधून कर्ज ७.५ कोटी रुपयांचे कर्ज घेतं होते. यानंतर ही कंपनी खासगी सचिवाला ७.९ कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

किरीट सोमैय्यांचा आरोप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वाशिम मतदारसंघातील शिवसेना लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप होत असल्याची तक्रार केली होती. यावरुन किरीट सोमैय्या यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. नितीन गडकरी यांच्या पत्रामुळे वाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा झाला उघडकीस आला आहे. वाशिम शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या १०० कोटींच्या घोटळ्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शुक्रवारी वाशिम येथे भेट देणार असल्याचे किरीट सोमैय्या यांनी म्हटलं आहे.

भावना गवळींचे प्रत्युत्तर

भाजप माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी शिवसेने वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यावर भावना गवळी यांनी म्हटलं आहे की, किरीट सोमैय्या यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. एकेकाळी ते ही आमचे सहकारी होते. मात्र त्यांनी माझ्यासमोर येऊन बसावे आणि सांगावे की, कोणता भ्रष्टाचार झाला आहे तसेच कशामध्ये झाला आहे. मी त्याच्यावर उत्तर देईन असे प्रत्युत्तर शिवसेना खासदार भावना गवळी यांनी दिलं आहे.


हेही वाचा : कोल्हापुरात आम्हाला कोणी रोखूच शकत नाही; सोमय्यांचं खुलं आव्हान


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -