घरमहाराष्ट्र'नथुराम गोडसेचं उदात्तीकरण न थांबवल्यास जशास तसं उत्तर देऊ'

‘नथुराम गोडसेचं उदात्तीकरण न थांबवल्यास जशास तसं उत्तर देऊ’

Subscribe

अहिंसावादी गांधी यांची हत्या करणारा हिंदू महासभेचे सदस्य नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करून हिंदू दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम करणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भीम आर्मी सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केली आहे.

अहिंसावादी गांधी यांची हत्या करणारा हिंदू महासभेचे सदस्य नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करून हिंदू दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम करणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करतानाच दहशतवादाला रंग नसतो हे खरे आहे. मात्र हे जरी खरे असले तरी देशात विशिष्ट रंगाच्या लोकांच्या दहशतवादी कारवायांचे चाललेले उदात्तीकरण थांबविण्यात यावे अन्यथा भीम आर्मीलाही त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, असा इशारा भीम आर्मी या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी दिला आहे.

लोकशाही देशात दहशत माजविण्याचा हा प्रकार

जेष्ठ सिने अभिनेते कमल हसन यांनी गांधी हत्येतील आरोपी नथुराम गोडसे यांच्याविषयी बोलताना गोडसे हे स्वतंत्रत भारतीय पहिले हिंदू दहशहतवादी होते, असे विधान तामिळनाडू येथील अर्वाकुरची येथे एका प्रचार सभेत केले होते. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत कमल हसन यांना गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल, असा इशारा हिंदू महासभेचे अभिषेक अग्रवाल यांनी कमल हसन यांना दिला आहे. त्याचसोबत एआयडीएमकेकडून कमल हसन यांच्या विधानाचा निषेध करत कमल हसन यांची जीभ छाटली पाहिजे, असे विधान तामिळनाडुतील मंत्री टी. राजेंद्र यांनी केलेले आहे. गोडसे यांचे समर्थन करताना कमल हसन यांना गांधींकडे पाठविणे तसेच त्यांची जीभ छाटण्याची भाषा करणे हा देखील लोकशाही देशात दहशत माजविण्याचा प्रकार असल्याची टीका कांबळे यांनी केली आहे .

- Advertisement -

३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींचा खून झाल्यानंतर पुण्यात पेढे साखर वाटून आनंद साजरा केला जातो. शाहिद हेमंत करकरे यांना शाप देणाऱ्या तथाकथित साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाते. डॉ. नरेंद्र दाभोलकर कलबुर्गी, पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या दिवसाढवळ्या हत्या होतात. देशातील विचारवंतांच्या हत्येतील आरोपींच्या संशयाची सुई विशिष्ट वर्गाच्या लोकांकडे जाते परंतु या लोकांचेही उदात्तीकरण होणे हे सर्वधर्मसमभाव असणाऱ्या देशात निषेधार्ह असून अशा लोकांचे उदात्तीकरण करणाऱ्या संस्था आणि संघटनांची चौकशी करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी. देशद्रोही कारवाईमध्ये गुंतलेल्या सर्वच लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -