कोरेगाव-भीमा दंगलीच्या खटल्यातून भिडेंचे नाव वगळले

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे नाव कोरेगाव-भीमा दंगलीच्या खटल्यातून वगळण्यात आले आहे. या दंगलीमध्ये संभाजी भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात एकूण २२ गुन्हे दाखल असून ४१ आरोपींवर वर्षभरापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Sambhaji Bhide controversial statement india Shameless country

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे नाव कोरेगाव-भीमा दंगलीच्या खटल्यातून वगळण्यात आले आहे. या दंगलीमध्ये संभाजी भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात एकूण २२ गुन्हे दाखल असून ४१ आरोपींवर वर्षभरापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये संभाजी भिडे यांचे नाव नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान दिली. भिडेंचे कोरेगाव-भीमा दंगलीशी प्रत्यक्ष संबंध आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे नाव खटल्यातून वगळण्यात आल्याचा लेखी अहवाल पोलिसांनी दिला आहे.

ठाण्यातील वकील आदित्य मिश्रा यांनी संभाजी भिडे यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचे सांगत त्यातून यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आयोगाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव दंगल प्रत्यक्ष संबंध आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचं नाव खटल्यातून वगळण्यात आल्याचं लेखी अहवाल दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे यांचा कोरेगाव भीमा दंगलीत सहभाग दाखवणारा कोणताही ठोस पुरावा पोलिसांना आढळला नाही. म्हणूनच त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे. पुण्यातील कोरेगाव भीमा १ जानेवारी २०१८ रोजी पुण्याजवळील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला. या घटनेचे पडसाद नंतर महाराष्ट्राच्या राजकारणावरही पडले होते. या हिंसाचाराप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता.