घरमहाराष्ट्रपुणेBhidewada : स्मारक निर्मितीमध्ये जुन्या आणि आधुनिक पद्धतीची सांगड घाला; भुजबळांचे निर्देश

Bhidewada : स्मारक निर्मितीमध्ये जुन्या आणि आधुनिक पद्धतीची सांगड घाला; भुजबळांचे निर्देश

Subscribe

पुणे : भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच त्याच्या दृश्य स्वरूपाची सावित्रीबाईंच्या काळात जसे असेल अशा जुन्या काळाशी सांगड घाला असे निर्देश अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले. तसेच फुले वाडा स्मारक विस्तारीकरणासाठी आवश्यक निधी राज्य शासनाच्यावतीने देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. (Bhidewada Combine old and modern methods in monument creation Bhujbals instructions)

पुणे शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा आणि महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगररचना विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक राजेंद्र पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश सूळ, महानगरपालिकेच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे, कार्यकारी अभियंता सुनील मोहिते आदी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : MARATHA RESERVATION: फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं बरळतायत; जरांगेंचा दावा

यावेळी भुजबळ म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथे स्मारक उभारताना ती ‘सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा’ अशी वाटली पाहिजे. यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात नामांकित वास्तुविशारदांकडून वेगवेगळे आराखडे तयार करुन घ्यावेत. आराखड्यात शाळेच्या परिसरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, म्युरलस दृकश्राव्य साधने, जुन्यापद्धतीचे दर्शनी भाग आदी बाबींचा विचार व्हावा. जागेचा विचार करता शाळेच्या इमारतीत उद्वाहकाची व्यवस्था करावी. प्रथम तज्ज्ञांच्या समितीकडून हे आराखडे निवडावे. या परिसरात वाहनतळासाठी असलेल्या पार्किंग आरक्षनाच्या जागेवर बहुमजली पार्कींग विकसित करण्याच्या दृष्टीने विचार करावा. स्पर्धात्मक युगाचा विचार करता या शाळेतून महिला अधिकारी घडविण्याच्या दृष्टीने शाळेची रचना व आधुनिक अभ्यासक्रमाबाबत महानगरपालिकेने चाचपणी करावी. ही शाळा पुणे महानगर पालिका संचलित करेल. समितीने आराखडा अंतिम केल्यानंतर स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु करावे. स्मारक पूर्ण झाल्यानंतर अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असे भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : “जे लोक मनाने मोठे असतात ते…”, Deepak Kesarkar यांनी केले नारायण राणेंचे तोंड भरून कौतुक

निधी राज्य सरकार उपलब्ध करून देईल

महात्मा फुलेवाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारकाला जोडणाऱ्या मार्गाचे आरक्षण नगर रचना विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावे. आरक्षण निश्चितीनंतर पुणे महानगरपालिकेने भूसंपादनाची कार्यवाही सुरु करावी. यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करावी. नागरिकांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा अशा सूचनाही भुजबळ यांनी दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि संचालक पाटील यांनी कामाच्या अनुषंगाने बैठकीत माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -