घरमहाराष्ट्रएल्गार परिषदेतील भाषणांमुळे हिंसाचार - पोलिस

एल्गार परिषदेतील भाषणांमुळे हिंसाचार – पोलिस

Subscribe

एल्गार परिषदेमध्ये चिथावणीखोर भाषणं झाली. त्यामुळे भीमा - कोरेगाव हिंसाचार झाला असा ठपका पुणे पोलिसांनी ठेवला आहे. हिंसाचाराच्या चौकशी आयोगासमोर पुणे शहर पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा – कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी आता प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. एल्गार परिषदेमध्ये चिथावणीखोर भाषणं झाली. त्यामुळे भीमा – कोरेगाव हिंसाचार झाला असा ठपका पुणे पोलिसांनी ठेवला आहे. हिंसाचाराच्या चौकशी आयोगासमोर पुणे शहर पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. परिषदेमध्ये झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे उपस्थितांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्याचा परिणाम हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्यामध्ये झाला असं देखील या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं आहे. पुणे शहर पोलिसांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. रवींद्र सेनगावकर यांच्या हद्दीमध्ये एल्गार परिषदेचं आय़ोजन करण्यात आलं होतं. पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये भाषणांविरोधात दाखल करण्यात आलेले एफआयआर, चिथावणीखोर भाषणं याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. शिवाय, एल्गार परिषदेचे आयोजक या हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचं देखील सेनगावकर यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं आहे. मात्र पुणे शहर पोलिसांव्यतिरिक्त  पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रतिज्ञापत्रात कोणत्या एका संस्थेला आणि व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलेलं नाही.

काय आहे प्रकरण

भीमा – कोरेगावच्या लढाईला ३१ डिसेंबर २०१७ रोजी दोनशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भीमा कोरेगाव शौर्य दिन अभियानातर्फे एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर १ जानेवारी २०१८ रोजी भीमा – कोरेगाव येथे हिंसाचार झाला. ज्यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र आता पुणे शहर पोलिसांनी सादर केलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -