घरताज्या घडामोडीभीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी आरोपी स्टॅन स्वामी यांचे निधन

भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी आरोपी स्टॅन स्वामी यांचे निधन

Subscribe

कार्डअँक अरेस्टमुळे स्टॅन स्वामी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांचे आज, सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास निधन झाले. (Bhima Koregaon violence accused Stan Swamy dies) ते ८४ वर्षांचे होते. स्टॅन यांना ९ ऑक्टोबर २०२० रोजी भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी रांची येथून अटक करण्यात आली होती. तळोजा कारागृहात असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तळोजा कारागृहातून मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दोन आठवड्यांसाठी उपचाराकरिता दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायाकडून राज्य सरकारला देण्यात आले होते. त्यानुसार त्यांना तळोजाहून वांद्रे येथील हॉली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कार्डअँक अरेस्टमुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. स्टॅन हे बेशुद्ध अवस्थेत होते. सोमवारी दुपारी १:२४ मिनिटांनी त्यांना डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती स्टॅन स्वामी यांचे वकिल मिहीर देसाई यांनी दिली. सरकार आणि तपास यंत्रणांना स्टॅन स्वामी यांनी वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यात विलंब झाल्याचा आरोप स्टॅन स्वामी यांच्या वकिलांनी केला आहे. या प्रकरणाची न्यायालयाने चौकशी करावी अशी मागणी देखील वकिलांकडून करण्यात आली आहे.


स्टॅन स्वामी यांना उपचारांसाठी हॉली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यासाठी तयार आहोत असे स्टॅन यांच्या वकिलांकडून न्यायालयाला सांगण्यात आले होते.मात्र केंद्र व राज्यसरकारने यावर आक्षेप घेत खासगी रुग्णालयात दखल केले असता सरकार त्यांचा खर्च करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार न्यायालयाने स्वामी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी दिली होती.

- Advertisement -

खोट्या पुराव्यांच्या आधारे (यूएपीए) कलम ४३ ड(५) कलमान्वये स्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  वैद्यकीय कारण देत त्यांना जामीन देण्याची मागणी देखील केली होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने रविवारी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली. त्यात तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले होते. तळोजा कारागृहात आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याच्या तक्रारी देखील अनेक वेळा करण्यात आल्या होत्या.


हेही वाचा – ते ५० होते अन् मी एकटाच होतो, काय घडलं नेमकं अध्यक्षांच्या चेंबरमध्ये

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -