भिमाशंकर अभयारण्य रानभाज्यांनी फुलले

नवीन पिढीला रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने रानभाज्यांच्या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. या रानभाज्यांच्या महोत्सावाने भिमाशंकर अभयारण्य रानभाज्यांने फुलले दिसून येत आहे. या महोत्सवाला तरुण पिढीने देखील उत्तम प्रतिसाद दिला आहे.

bhimashankar is full of jungle vegetables
भिमाशंकर अभयारण्य रानभाज्यांने फुले

भिमाशंकर अभयारण्याच्या परीसरातील भोरगिरी भाग रानभाज्यांने फुलले आहे. खेड येथे वनविभाग, महिला बचत गट, हुतात्मा राजगुरु महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कँम्प, कल्पवृक्ष संस्थेच्या वतीने देवराई वनामध्ये रानभाज्या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन एकनाथ सांडभोर,सरपंच सुधीर भोमाळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

रानभाज्यांची ओळख व्हावी

या रानभाज्यांचा पावसाळी हंगाम संपत आला आहे. खेडच्या पश्चिम आदिवासी भागातील सह्याद्रीच्या डोगंरांगातून मोठ्या प्रमाणावर रानभाज्या उगवतात. या रानभाज्या पावसाळ्यात या भागात राहणाऱ्या लोकांना रोजच्या जेवणात वरदान ठरत असल्या तरी शहरी भागातील लोकांनाही या भाज्यांची ओळख होण्यासाठी आणि या रानभाज्यांची आपल्या नवीन पिढीला ओळख व्हावी म्हणून या भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून रानभाज्या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वंयसेवाभावी संस्था बरोबरच पंचायत प्रशासन या उपक्रमात सहभाग घेऊ लागल्याबरोबरच शहरी भागातील पर्यटक भंटकती बरोबरच या रानभाज्याच्या महोत्सावात सहभागी होऊ लागल्याने समाजात रानभाज्यांची लुप्त होऊ लागलेली ओळख आणि जनजागृती होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या महोत्सवाला एन.एस.एस.चे प्रमुख प्रा. मंच्छीद्र मुळुक, वनपाल व्ही.पी.कदम, अंगणवाडी पर्यवेक्षिका चंद्रभागा खामकर, ग्रंथपाल राजेंद्र सुतार, कमल भोमाळे, अशोक कोरडे, हनुमंत उबाळे, कल्पवृक्ष संस्थेचे सुभाष डोळस आदिसह महाविद्यालयीन युवक युवती, शिक्षक, महिला, ग्रामस्थासह पुणे, राजगुरुनगर, संगमनेर भागातील पर्यटक आणि निसर्गप्रेमी उपस्थित होते.

रानात विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या रानभाज्या प्रत्यक्ष कधी ऐकण्यात आल्या नाही. मात्र येथे आल्यानंतर या रानभाज्यांची माहिती, गुणधर्म आणि प्रत्यक्षात कशा पद्धतीने भाजी बनवले जाते. याचे प्रात्यक्षिक पाहुन चव समजल्याचे हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातील एन एस.एसच्या सहभागी युवतीनी प्रतिक्रिया व्यक्त केली.