भोंदूबाबाने केला तीन मुलींसह आईवर बलात्कार

व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

लग्न ठरत नसल्यामुळे भोंदूबाबाकडे गेलेल्या मुलीवर कोणीतरी कर्णी केली आहे, असे सांगत भोंदूबाबा व त्याच्या वकील असलेल्या भावाने पीडित मुलीसह तिच्या आई आणि दोन बहिणींवर दोन वर्षे चार महिने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, भोंदूबाबाने अश्लिल फोटो काढत व्हिडीओ क्लिप तयार केली. त्याने ती क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आठ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी येवला पोलिसांनी सामुहिक बलात्कार, पोस्कोसह धमकीचा गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. भोंदूबाबा सुफी अजीज अब्दुल बाबा (दोघेही रा. नागडे, ता.येवला, जि.नाशिक), अ‍ॅड. जब्बार रज्जाक शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मुलीचे लग्न जमत नसल्याने येवला तालुक्यातील नागडे गावातील एक महिला तीन मुलींसह बाबाकडे गेली. बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे, असे सांगत सुरुवातीला मंतररलेले पाणी देत चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला. त्यावेळी त्याने अश्लिल फोटो काढत व्हिडीओ क्लिप तयार केली. या क्लिपव्दारे भोंदूबाबाने पीडित मुलीसह तिच्या आई आणि दोन मुलींवर तब्बल दोन वर्षे चार महिने बलात्कार केला. त्यानंतर भोंदूबाबाने व्हिडीओ क्लिपची धमकी देत पीडित कुटुंबियांकडे पैशांची मागणी केली. भोदूबाबाचा छळ असह्य झाल्याने पीडितेने येवला पोलीस ठाण्यात आपबिती सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखत मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पोलिसांनी दोन भोंदूबाबांना अटक केली.

मुस्लीम धर्मांतरासाठी दबाव

भोंदूबाबाने व्हिडीओ क्लिपची धमकी देत पीडित कुटुंबियांकडून तब्बल आठ लाख रुपये उकळले. त्यानंतर भोंदूबाबाने तक्रारदार पीडित मुलींच्या मनात हिंदू धर्माबद्दल व्देष निर्माण केला. त्याने मुलींना मुस्लीम धर्म स्विकारण्यास प्रवृत्त केले, असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे.

पोलीस अधीक्षकांचे आवाहन

अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत तीन मुली आणि त्यांच्या आईवर बलात्कार करणार्‍या भोंदूबाबा व त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत कोणी फसवणूक व शोषण करत असेल तर पुढे यावे. मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधा. फसवणूक व शोषण करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या जातील.
सचिन पाटील, पोलीस अधीक्षक