घरमहाराष्ट्रपक्षातील अस्वस्थतेमुळे भाजपच्या अभेद्य बालेकिल्ल्याला तडे

पक्षातील अस्वस्थतेमुळे भाजपच्या अभेद्य बालेकिल्ल्याला तडे

Subscribe

पक्षातील अस्वस्थेमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या अभेद्य अशा बालेकिल्ल्याला तडे जाऊ लागले आहेत. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना चिंचवडमधील अनेक नेते राष्ट्रवादीत जात आहेत. दरम्यान, हात कित्ता आता भोसरी विधानसभा मतदारसंघातही गिरवला जाऊ लागला आहे.

पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ लागल्याने भाजप आमदार तथा शहारध्यक्ष महेश लांडगे यांच्यासमोर आता आव्हान उभं राहिलं आहे. तसंच, परिस्थिती हाताबाहेर गेली तर शंभर प्लसचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपवर महापालिकेतील सत्ता गमावण्याची वेळ येऊ शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

- Advertisement -

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक २०१७ साली झाली. यावेळी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला झटका देत एकहाती सत्ता मिळवली. मात्र, सत्ता मिळवताना राष्ट्रवादीमधील अनेकांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली. निवडणुकांच्यावेळी भाजपने ‘ना भय, ना भ्रष्टाचार’, ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ यासारख्या घोषणा देत शहरातील जनतेला भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सत्ता मिळताच राष्ट्रवादीने केलेले भ्रष्ट कारभाराचे विक्रम मोडीत काढत भाजपच्या नेत्यांनी नव्याने विक्रम प्रस्थआपित केल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर समोर आलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -