घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'ते' प्रकरण भोवले, आ. बच्चू कडूंना नाशिक कोर्टाने सुनावली एका वर्षाची शिक्षा

‘ते’ प्रकरण भोवले, आ. बच्चू कडूंना नाशिक कोर्टाने सुनावली एका वर्षाची शिक्षा

Subscribe

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (दि.८) आमदार बच्चू कडू यांना एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. २०१७ मध्ये नाशिक महापालिका आयुक्तांना शिवीगाळ व त्यांच्यावर हात उगारल्याप्रकरणी न्यायालयाने बच्चू कडूंना दोषी ठरवले आहे. दरम्यान, या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाणार आहेत. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार आहे, अशी प्रतिक्रिया निकालानंतर बच्चू कडू यांनी दिली.

नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे आंदोलन सुरू करण्यात आले होते. महापालिका आयुक्तांनी दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, असा आरोप करत बच्चू कडू यांनी २०१७ मध्ये आंदोलन केले होते. यावेळी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासोबत बच्चू कडूंचा वाद झाला होता. यावेळी बच्चू कडूंनी आयुक्तांना धमकावले व त्यांच्यावर हात उगारला, असा आरोप आहे. दरम्यान, आंदोलनानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यातही घेतले होते. सरकारी अधिकार्‍यावर हात उगारणे व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बच्चू कडूंवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2017 पासून याप्रकरणी बच्चू कडूंविरोधात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालायात सुनावणी सुरु होती. या दोन्ही गुन्ह्यात बुधवारी न्यायालयाने बच्चू कडू यांना एका वर्षाची शिक्षा सुनावली.

- Advertisement -

न्यायालयाच्या निकालानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले आहे. येथे जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. नाशिक महापालिका आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने भादंविचे कलम 353 अन्वये शिक्षा सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -