घरमहाराष्ट्रनाशिकBhujbal On Damania : भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेवर छगन भुजबळ म्हणाले; "मला कोणतीही ऑफर नाही"

Bhujbal On Damania : भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेवर छगन भुजबळ म्हणाले; “मला कोणतीही ऑफर नाही”

Subscribe

छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा करणारे ट्वीट समाजसेविका अंजली दमानिया यांनी केला आहे.

नाशिक : ‘भाजपाकडून मला कोणतीही ऑफर नाही’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अंजली दमानिया यांच्या दाव्यावर दिली आहे. यानंतर छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. माझी पक्षात घुसमट नाही, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर आहे, असे ट्वीट समाजसेविका अंजली दमानिया यांनी केले आहे. भाजपाकडून मला कोणतीही ऑफर नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले, “मला कुठल्या पदाची हौस नाही. मी ओबीसींसाठी 35 वर्षापासून काम करत आहे. अंजली दमानिया यांना कुठून माहिती मिळाली आणि याबद्दल मला काही माहिती नाही. पण मला कोणतेही प्रपोजल आलेले नाही. मी देशभर ओबीसींसाठी काम करत आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Reservation : …कुठे फेडाल हे पाप? ‘हा’ दावा करत अंजली दमानिया यांचे भाजपावर टीकास्त्र

माझी पक्षात घुसमट नाही

अजित पवार गटात तुमची घुसमट होत असल्याच्या चर्चा सुरू आहे? या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, “मी मंत्री आहे आणि पक्षात माझ्याविरोधात कोणी काही बोलत नाही. मी ओबीसीसाठी काम करतोय, त्यांना तो हक्क आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत. यामुळे पक्षात घुसमट होण्याचा प्रश्न येत नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray On BJP :…ये बता कि काफिला क्यूँ लुटा? ठाकरेंचा शायराना अंदाजात भाजपला सवाल

भुजबळ भाजपाच्या वाटेवर; दमानियांचा दावा

अंजली दमानिया ट्वीटमध्ये म्हणाल्या, “भुजबळ भाजपाच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप”, असे ट्वीट करत भाजपावर हल्लाबोल केला आहे. यामुळे अंजली दमानिया यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -