घरमहाराष्ट्रBhujbal On Gaikwad : छगन भुजबळांचा संजय गायकवाडांना टोला; "ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात..."

Bhujbal On Gaikwad : छगन भुजबळांचा संजय गायकवाडांना टोला; “ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात…”

Subscribe

'देशात लोकशाही आहे आणि मनोज जरांगे हे मोठे नेते आहेत. बजेटमधून मला आरक्षण द्या, अशी मागणी देखील त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. मला हा उपाय कधी सुचले नव्हते, असा टोलाही मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना लगावला आहे.

नाशिक : ‘ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लगावला. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. यानंतर संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती.

छगन भुजबळ म्हणाले, “मी पण ते ऐकले आणि वाचले सुद्धा, माझा राजीनामा मागण्याचा अधिकार हा सामान्य जनतेप्रमाणे आमदारांना सुद्धा आहे. त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. पण, त्यांनी जी भाषा वापरली, ती बरोबर नाही. ते आताही शिवसेनेचे आहे म्हणजे पूर्वीही शिवसेनेतच असणार, मला त्यांना सांगायचे आहे की, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो”, असा टोला छगन भुजबळ यांनी संजय गायकवाड यांना लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – Bhujbal On Damania : भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेवर छगन भुजबळ म्हणाले; “मला कोणतीही ऑफर नाही”

“संजय गायकवाडांनी भाषा जरा जपून वापरायला पाहिजे. गायकवाड यांच्या वक्तव्याबाबत आता शिंदे पाहतील. पण गायकवाडांनी कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, असे म्हटले. मला मंत्रिमंडळात बाहेर काढायचे की ठेवायचे, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. संजय गायकवाडांना कल्पना आहे की, तसे करणार नाही. मुख्यमंत्र्यांचे जे गुरू आहेत, आनंद दिघे आणि मोदा जोशी आहेत. तसेच शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर नेता म्हणून मी काम केलेले आहे. लाथ मारण्याची भाषा करणे हे योग्य नाही. हे मुख्यमंत्र्यांना समजते, ते मला कधीही मंत्रिमंडळातून बाहेर काढू शकतात आणि त्यांचे मला दु:ख वाटणार नाही”, असे छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Shelar On Uddhav Thackeray : …म्हणून हवी जनतेला मोदींची गँरंटी! शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल

बजेटमधून मोदींकडे आरक्षणाची मागणी केली

मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाला बसणार आहे. त्याबद्दल छगन भुजबळ म्हणाले, “मनोज जरांगे हे उपोषणाला बसले की, आमचे निर्णय आणि जीआर तयार असतात. या पुढे ते सतत उपोषणाला बसत राहतील. मग शिक्षण, शेतकरी प्रश्न आणि महिला या प्रश्नासाठी देखील मनोज जरांगे हे उपोषणाला बसू शकतात. देशात लोकशाही आहे आणि ते मोठे नेते आहेत. बजेटमधून मला आरक्षण द्या, अशी मागणी देखील त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. मला हा उपाय कधी सुचला नव्हता, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -