घरमहाराष्ट्रBhujbal : सत्ता डोक्यात गेली की शब्द बदलतातच..., शरद पवार गटाचा भुजबळांवर...

Bhujbal : सत्ता डोक्यात गेली की शब्द बदलतातच…, शरद पवार गटाचा भुजबळांवर निशाणा

Subscribe

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बहाल केले आहे. त्यावरून आता अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. यानिमित्ताने शरद पवार गटाकडून अजित पवार गटाचे जुने व्हिडीओ शेअर केले जात आहे. आताही राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाकडून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी”, संजय राऊतांचा टोला

- Advertisement -

गेल्यावर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा केला. त्यामुळे हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. यावरील सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले. तर, 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीकरिता शरद पवार गटाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ हे नाव घेतले.

- Advertisement -

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाने आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना सोपविल्यानंतर अजित पवार यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. धमक होती तर पक्ष काढा ना? तुम्हाला कुणी अडवलं होतं? असे अजित पवार व्हिडीओत म्हणाले आहेत.

हेही वाचा – Thackeray group : ‘ही’ गॅरंटी मोदी-शहांच्या राजकारणाने दिली आहे, ठाकरे गटाचे शरसंधान

तर, आता शरद पवार गटाने छगन भुजबळ यांचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर, ‘लोकांच्या मनात तुमच्याबद्दल रागच आहे,’ असे भुजबळ यांनी 2023मध्ये म्हटले होते. पण नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटल्यानंतर, कायदेशीर व्यवस्था करूनच आम्ही आलो असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सत्ता डोक्यात गेली की शब्द बदलतातच! ही तुमची एका वर्षात बदललेली भाषा? कायद्याची व्यवस्था करणारे म्हणजे तुम्ही स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजू लागलात का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. तसेच, आज देशात लोकशाहीचा कणा मोडून जो कारभार केला जात आहे आणि हे गद्दार ज्या भाषेत बोलत आहेत, या गद्दारांना कायद्याच्या आणि लोकशाहीच्या भाषेतच लवकरच उत्तर देऊ, असा इशाराही शरद पवार गटाने दिला आहे.

हेही वाचा – Danve about CM : वंदे भारत, राम मंदिर या गोष्टी…, अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -