Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भुजबळांचा अधिकार्‍यांना इशारा

भुजबळांचा अधिकार्‍यांना इशारा

कामाला लागा, ही वेळ आरामाची नाही

Related Story

- Advertisement -

जिल्हयामध्ये व्हेंटीलेटर बेडची आवश्यकता असतांना जिल्हा रूग्णालयात पडून होते ही बाब धक्कादायक आहे. त्यामुळे कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.त्यामुळे या कारवाईवरून आता इतर अधिकार्‍यांनीही समजून घ्यावे असा सुचक इशाराही देत कामाला लागा, ही वेळ आरामाची नाही असा इशाराच जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, जिल्हा रूग्णालयात व्हेंटीलेटर वापराविना पडून असल्याची बाब धक्कादायक आहे. त्यामुळे नाशकात रुग्णसंख्या वाढत असतांनाही जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपाययोजनांबाबत केलेली दिरंगाई आणि गलथान कारभाराप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कालच्या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सकांनी योग्य उत्तरे दिली नाही. यापुर्वी दोन वेळा आधी त्यांना समज दिली होती. व्हेंटीलेटरची गरज पड़त असतांना सिव्हीलमध्ये व्हेंटीलेटर पडून होते ही बाब धक्कादायक आहे. त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या. मी आरोग्यमंत्र्यांना आधीच त्यांच्याबाबत सांगितले होते. शेवटी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे लागले. ही कारवाई बघून इतर अधिकार्‍यांनी समजून घ्यावे असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. ही वेळ आरामाची नाही असे सांगत अधिकार्‍यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

निर्बंधाबाबत इतर शहरांचा अभ्यास सुरू
नाशिकमध्ये रूग्णसंख्या वाढतेयं हे खरं आहे परंतु याचा अर्थ लॉकडाऊन करणे हा पर्याय असू शकत नाही. इतर शहरांमध्येही लॉकडाऊन करण्यात आले काही ठिकाणी तर हा निर्णय मागे घ्यावा लागला. औरंगाबादमध्ये लॉकडाऊन रदद करण्यात आला. नागपुरमध्ये आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. नाशिकमध्येही लॉकडाऊनबाबत विविध मतमतांतरे आहेत. काहीजण म्हणतात पुर्ण लॉकडाऊन करा, काही जण पन्नास टक्के करा सांगतात तर काहींनी तर याला विरोध केला आहे. रूग्णसंख्या कमी होत गेली तर मला वाटत नाही लॉकडाऊन करावा लागेल पण आपण परिस्थिती पाहून निर्णय घेऊ लॉकडाउनबाबत इतर शहरांचाही आपण अभ्यास करत आहोत मात्र लॉकडाऊन करायचा असल्यास तो त्वरीत लागू न करता नागरीकांना तीन ते चार दिवसांचा अवधी दिला जाईल असे ते म्हणाले.

काय म्हणाले भुजबळ
– एसटी बसेसवरही नियत्रंण ठेवणे गरजेच
– 50 टक्के क्षमता बसेसची करता येते का ते बघू
– गुजरातमध्ये महाराष्ट्रातून येणार्‍या लोकांची टेस्ट बंधनकारक आहेत
– हळू हळू आपल्याकडेही निर्बंध वाढवू
– पुण्यात आज अनेक लागू केले आहेत
– जेलमधून सुटल्यानंतर गुन्हेगारांची मिरवणूक काढल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई होईल
– गुन्हेगारी वाढली आहे पण अधिकार्‍यांना समज दिला आहे
– सर्वाना संधी द्यायला हवी

- Advertisement -