घरताज्या घडामोडीभूषण गगराणी यांची सीएमओत नियुक्ती

भूषण गगराणी यांची सीएमओत नियुक्ती

Subscribe

नियुक्ती करताना गगराणी यांच्याकडील नगरविकास, जलसंपदा आणि मराठी भाषा विभाग या पदांचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी त्यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला. नियुक्ती करताना गगराणी यांच्याकडील नगरविकास, जलसंपदा आणि मराठी भाषा विभाग या पदांचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत ठेवण्यात आला आहे. (Bhushan Gagrani appointed as Additional Chief Secretary of cm Eknath Shinde)

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपले अतिरिक्त सचिव म्हणून आशीषकुमार सिंह यांच्या जागी भूषण गगराणी यांची नेमणूक केली. सिंह यांना मुख्यमंत्री कार्यालयातून बाजूला करताना विकास खारगे यांच्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खारगे यांना मुख्यमंत्री कार्यालयात नेमले होते.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री म्हणून काम करताना भूषण गगराणी हे एकनाथ शिंदे यांच्या खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. त्यामुळे शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यलयात गगराणी यांची नियुक्ती अपेक्षित होती. भूषण गगराणी हे ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्यांनी याआधी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून काम पहिले आहे. याशिवाय वैद्यकीय शिक्षण, एमआयडीसी, सिडको आदी ठिकाणी त्यांनी काम केले आहे.

दरम्यान, मृद आणि जलसंधारण विभागाचे सचिव दिलीप पांढरपट्टे यांची बदली अमरावतीचे विभागीय आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार नंद कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -