राजमाता अहिल्यादेवींचे वंशज भूषण सिंह होळकर यांचा भाजपात प्रवेश

राजमाता अहिल्यादेवींचे वंशज भूषण सिंह होळकर यांनी भाजपात प्रवेश केला. होळकर यांच्यासोबतच माथाडी कामगार नेते अविनाश ग्रामिष्ठे, माजी आमदार संदेश कोडविलकर, तेली साहू समाजाचे माजी अध्यक्ष अशोक साहू, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे सरचिटणीस नरेंद्र कामठे यांनी देखील भाजपात प्रवेश केला.

Bhushan Singh Holkar a descendant of Rajmata Ahilyadevi entered BJP
राजमाता अहिल्यादेवींचे वंशज भूषण सिंह होळकर यांचा भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात मोठमोठे नेते पक्षप्रवेश करत आहेत. रविवारी राजमाता अहिल्यादेवींचे वंशज भूषण सिंह होळकर यांनी भाजपात प्रवेश केला. होळकर यांच्यासोबतच माथाडी कामगार नेते अविनाश ग्रामिष्ठे, माजी आमदार संदेश कोडविलकर, तेली साहू समाजाचे माजी अध्यक्ष अशोक साहू, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे सरचिटणीस नरेंद्र कामठे आदिंसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रविवारी मुंबईत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

कामे पाहून लोकांनी विश्वास ठेवला – चंद्रकांत पाटील

या कार्यक्रमात चंद्रकांच पाटील म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाली. आज रेल्वेचे टॉयलेट बायो टॉयलेट झाले. इतक्या बारीक गोष्टीचा विचार मोदींनी केला. गेल्या पाच वर्षात अशा बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणून लोकांनी भाजपवर विश्वास ठेवला.’ त्याचबरोर ‘मराठा आरक्षणाचा विषय देखील याच सरकारने घेतला. धनगर आरक्षणाचा निर्णय कोर्टात आहे, तरीदेखील आदिवासी लोकांना मिळणाऱ्या २२ सुविधा धनगर समाजाला देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. ही पार्टी कोण कुठल्या घरातून आला हे न बघता त्या माणसाचे काम करते’, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.


हेही वाचा – पुण्यात राष्ट्रवादी ४ तर काँग्रेस ३ जागांवर लढणार; अजित पवार यांची घोषणा