अमरावती आणि सुरत दरम्यान द्वि-साप्ताहिक अतिजलद ट्रेन पूर्ववत

Demu special service resumes between Manmad and Huzur Sahib Nanded
मनमाड आणि हुजूर साहिब नांदेड दरम्यान डेमू  विशेष सेवा पूर्ववत

रेल्वेने पुढील सुचनेपर्यंत अमरावती आणि सुरत दरम्यान सुपरफास्ट द्वि-साप्ताहिक ट्रेन पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक २०९२५ अतिजलद द्वि-साप्ताहिक ट्रेन दि. २१.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी १२.२० वाजता सुरत येथून सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी २२.२५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक २०९२६ अतिजलद द्वि-साप्ताहिक ट्रेन दि. २२.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत प्रत्येक सोमवार आणि शनिवारी ०९.०५ वाजता अमरावती येथून सुटेल आणि सुरत येथे त्याच दिवशी १९.०५ वाजता पोहोचेल.

थांबे: बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, सिंदखेड, दोंडाईचा, नंदुरबार, नवापूर, व्यारा, उधना जं.

संरचना: १ वातानुकूलित चेअर कार, ४ द्वितीय श्रेणी चेअर कार, १२ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण: २०९२६ अतिजलद द्वि-साप्ताहिक ट्रेनसाठी सामान्य शुल्कासह बुकिंग दि. २०.११.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

वरील ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrgov.in ail.ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे, एसओपींचे पालन करून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.


हे ही वाचा – Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित, पालकमंत्री आणि फडणवीसांचे आश्वासन