घरCORONA UPDATECoronaVirus: दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय!

CoronaVirus: दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय!

Subscribe

राज्यावरच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या चार-पाच दिवसांत दूध संकलन सुरु होईल आणि ‘कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत कोरोना प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेल्या राज्यातील दूधव्यवसाय, दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला.

भुकटी करून ऑनलाईन होणार विक्री

कोरोनामुळे दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित १२ लाख लिटर दूधापैकी १० हजार लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खासगी बाजारात दूधाचा दर १५ ते १७ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूधउत्पादकांना याचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त ठरत असलेले १० लाख लिटर दूध दूधसंस्थांच्या माध्यमातून सरकार २५ रुपये प्रतिलिटर दराने खेरदी करेल. त्या दुधाची भुकटी करुन ती साठवण्याचा आणि नंतर त्याची ऑनलाईन विक्री करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

- Advertisement -

२०० कोटींचा निधी लागणार

राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना आधार मिळेल. यासाठी साधारणपणे २०० कोटी रुपये निधी लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, दुग्धविकासमंत्री सुनील केदार (दूरध्वनीद्वारे), वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह वरिष्ठ अधिकारी तसेच दूध महासंघाचे आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -