ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का, माजी आमदार शिंदे गटात सामील

माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाला समर्थन दिले. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना शिंदे गटात उपनेतेपद आणि प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

krushna hegde

मुंबई – शिवसेनेला (Shivsena) लागलेल्या बंडखोरीचं ग्रहण कमी होताना दिसत नाहीय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Group) मोठे खिंडार पडले. आता शिवसेनेतील आणखी एक माजी आमदार शिंदे गटात सामील झाला आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे (Former MLA Krushna Hegde) यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांच्यासोबत असंख्य समर्थकांनीही शिंदे गटाला जवळ केले आहे.

हेही वाचा – आरोग्यमंत्री दाखवा व एक लाख रुपये मिळवा, ठाकरे गटाचा तानाजी सावंतांवर निशाणा

माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाला समर्थन दिले. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना शिंदे गटात उपनेतेपद आणि प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुंबईतील विलेपार्ले भागात कृष्णा हेगडे यांचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस, भाजपा, शिवेसना अशा पक्षात काम करून ते आता शिंदे गटात सामील झाले आहेत.


कृष्णा हेगडे हे पूर्वी काँग्रेसचे कट्टर समर्थक होते. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जायचे. मात्र, संजय निरूपम यांचे त्यांच्यासोबत वाद झाल्याने कृष्णा हेडगे यांनी भाजपाला जवळ केले. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, भाजपासोबतही फारकत घेऊन त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आता त्यांनी ठाकरेंचीही साथ सोडली असून शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश ठाकरेंसाठी मोठी धक्का मानला जात आहे.