घरमहाराष्ट्रAshok Chavan : काँग्रेसला मोठा धक्का! अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा, लवकरच ‘हाती’...

Ashok Chavan : काँग्रेसला मोठा धक्का! अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा, लवकरच ‘हाती’ कमळ

Subscribe

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे लवकरच त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार असून चव्हाणांना थेट राज्यसभेत पाठवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत 10 ते 12 आमदारांचा गटही भाजपामध्ये प्रवेश करणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा… Supriya Sule : “वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का?” ताईंचे दादांना भावनिक आवाहन

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याची चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. परंतु, त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले अशोक चव्हाण यांनीच काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाणांनी सकाळीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याने याबाबतच्या चर्चांना उधाण आले.

अशोक चव्हाण यांच्याशिवाय काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट हा भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्याशिवाय नांदेडच्या चव्हाण समर्थकांकडून त्यांच्या भाजपा प्रवेशाचे पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जातील, अशी चर्चा होती. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. याशिवाय, बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, अशी चर्चा होती. परंतु, आता चव्हाणांनी भाजपावासी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात देण्यात येत आहे.

- Advertisement -

अशोक चव्हाण यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण आज (ता. 12 फेब्रुवारी) ज्यावेळी अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी मी पुन्हा येतो असे विधानसभा अध्यक्षांना सांगितले. त्यामुळे त्यांची ही भेट कायदेशीर प्रक्रिया समजून घेण्यासाठी होती, असेही आता बोलण्यात येत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हे नेमके कधी प्रवेश करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर चव्हाण हे भाजपामध्ये गेल्यास महाराष्ट्रात काँग्रेस खिळखिळी होईल. तर भादपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -