घरमहाराष्ट्रशिवसेनेला पुन्हा बसणार मोठा धक्का; आमदारांपाठोपाठ 14 खासदारही बंडाच्या पवित्र्यात

शिवसेनेला पुन्हा बसणार मोठा धक्का; आमदारांपाठोपाठ 14 खासदारही बंडाच्या पवित्र्यात

Subscribe

आता शिवसेनेचे लोकसभेत 19 आणि राज्यसभेत 3 सदस्य आहेत, शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीनंतर फुटीचा परिणाम लोकसभेत दिसून येईल, असे मानले जात आहे

नवी दिल्लीः एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेतील नाट्यमय घडामोडी अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. दरम्यान, पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसू शकतो. शिवसेनेच्या खासदारांमध्येही बंडखोरी होणार असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. त्यासाठी राष्ट्रपतीपदाच्या मतदानाची वाट पाहा, असे ते म्हणालेत. सूत्रांच्या माहितीनुसार किमान 14 खासदार शिवसेनेविरोधात बंड करू शकतात.

शिवसेनेचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासह आणखी काही खासदारांची शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता असून, श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वीच आपल्या वडिलांच्या गटात जाऊन शिवसेनेतून फारकत घेतली आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने एबीपी न्यूजला सांगितले की, किमान 14 खासदार राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करू शकतात, शिवसेनेच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेऊ शकतात. यासोबतच हे खासदार शिवसेनेपासून वेगळे होण्याची घोषणाही करू शकतात, आता शिवसेनेचे लोकसभेत 19 आणि राज्यसभेत 3 सदस्य आहेत, शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीनंतर फुटीचा परिणाम लोकसभेत दिसून येईल, असे मानले जात आहे. तसेच 14 खासदार शिवसेनेच्या विरोधात बंड करू शकतात.

- Advertisement -

आमदारांच्या समर्थनार्थ ठाकरे यांना पत्र लिहिले होते

कल्याणमधील शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे उघडपणे वडिलांसोबत आहेत, याशिवाय यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनीही बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे, गवळी यांनी या पत्रात बंडखोर आमदारांच्या हिंदुत्वाबाबतच्या तक्रारी सोडवण्याची मागणी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असता, ठाण्याचे खासदार राजन विचारे हे सध्या शिंदे यांच्यासोबत दिसत आहेत, मात्र लवकरच शिवसेनेच्या संसदीय पक्षातही मोठी बंडखोरी होणार असल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.


हेही वाचाः मी चौकशींच्या बाबतीत निडर; संजय राऊतांचा विरोधकांना टोला

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -