घरताज्या घडामोडीमहानगरपालिका शाळांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

महानगरपालिका शाळांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून येत्या १२ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

राज्यातील इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. शिष्यवृत्तीची परीक्षा आतापर्यंत दोनवेळा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परीक्षा महानगरपालिका शाळांसाठी होणार नाही. असा आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे. राज्यातील कोरोना संसर्ग आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी निर्णय घेतला आहे. राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महानगरपालिका शाळांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द केली आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, उपरोक्त संदर्भिय विषयांन्वये मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताचा व सुरक्षिततेचा प्राधान्याने विचार करुन मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार महानगरपालिका शाळांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाणार नाही. असा निर्णय जारी केला आहे.

- Advertisement -

१२ ऑगस्टला होणार परीक्षा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून येत्या १२ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. दरवर्षी सुमारे १० लाख पाचवी आणि आठवीत शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी नोंदणी करतात. मात्र यावेळी कोरोना संकटामुळे केवळ ६ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरलाय आहे. या विद्यार्थ्यांची १२ ऑगस्टला शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. मात्र, कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -