घरमहाराष्ट्रपरदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना दिवाळीत मोठा दिलासा; वडेट्टीवारांच्या आरोपानंतर शासन...

परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना दिवाळीत मोठा दिलासा; वडेट्टीवारांच्या आरोपानंतर शासन निर्णय जारी

Subscribe

मुंबई : परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या ओबीसी समाजाच्या 50 विद्यार्थ्यांवर उपासमारीचे संकट आले आहे. राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे न दिल्यामुळे जेवण, निवास खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न  विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग जाहिरातीसाठी  कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करतो. पण विद्यार्थ्यांना पैसे देत नाही, यासारखे दुर्दैव नाही, असा संताप व्यक्त करत सरकारने या विद्यार्थ्यांना तातडीने पैसे पाठवून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. (Big Diwali relief for OBC students pursuing higher education abroad Govt decision issued after Vijay Wadettivar accusation atul save)

हेही वाचा – शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागणार तरी काय? राहुल नार्वेकरांची महत्त्वाची टिप्पणी

- Advertisement -

इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी म्हटले की, परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख शासनाने मंजूर केले आहेत. इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय (GR) जारी केला आहे.

शासनाने परदेशातील शिष्यवृत्तीसाठी 2023-24 मध्ये 50 ओबीसी विद्यार्थ्यांची निवड केली असून या वर्षातील बॅचमधील 32 तर, मागील बॅचमधील 2 विद्यार्थांना 12 कोटी 88 लाख रुपये मंजूर झाले आहेत. ओबीसी प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या शिष्यवृत्तीचा नक्की लाभ होईल, असा विश्वास इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Beed burning : ऐन दिवाळीत कथित मराठा बांधवाची पोलिसांकडून धरपकड; 181 जणांची दिवाळी जेलमध्ये

आमदारांना, कंपन्यांना खूश करण्यात राज्य सरकार मग्न

दरम्यान, ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला फटकारले होते. त्यांनी म्हटले होते की, परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या 50 विद्यार्थ्यांना सरकारने संकटात टाकले आहे. शिष्यवृत्तीचे पैसे न दिल्याने विद्यार्थी एक वेळचे जेवण करत आहेत. फी भरली नाही तर त्यांना वर्गात बसू दिले जाणार नाही, अशी परिस्थिती आहे. पैसे संपल्याने विद्यार्थी विवंचनेत आहेत. मात्र, आमदारांना, कंपन्यांना खूश करण्यात मग्न असलेल्या सरकारला उपाशी असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी नाही. संचालक कार्यालयातून प्रस्ताव प्राप्त झाल्यावर पैसे वितरित करण्यात येतील, असे सांगत मंत्रालयातील अधिकारी जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे सरकारचा प्रशासनावर वचक राहिला नाही, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला फटकारले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -