घरमहाराष्ट्रमोठी बातमी! शिवसेना आणि धनुष्यबाण घेतल्यानंतर विधिमंडळातील कार्यालयावरही शिंदे गटाचा कब्जा

मोठी बातमी! शिवसेना आणि धनुष्यबाण घेतल्यानंतर विधिमंडळातील कार्यालयावरही शिंदे गटाचा कब्जा

Subscribe

मुंबई – शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाकडे गेल्याने वाग्-युद्ध सुरू झाले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दिक चकमक सुरू झाली असून अनेक ठिकाणी राडेही झाले. पक्षावर ताबा मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून पक्षाच्या कार्यालयांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदे गटाने विधिमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला आहे. तसंच, इतर कार्यालयेही ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा तातडीच्या सुनावणीसाठी उद्या या, सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला सल्ला

- Advertisement -

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात तर पक्षांतर्गत वाद निवडणूक आयोगाकडे सुरू होता. सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल केव्हा बाहेर येणार याबाबत काहीच माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, १७ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने अचानक निर्णय जाहीर केला. त्यानुसार, शिंदे गटाकडे शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह गेले.

निवडणूक आयोगाच्या या निकालामुळे ठाकरे गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला. निवडणूक आयोगाच्या या निकालाला ठाकरे गट उद्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच शिंदे गटाने आता शिवसेनेच्या विधिमंडळातील कार्यालयावर ताबा मिळवला आहे. तसंच, राज्यभरातील सर्व कार्यालयांवर ताबा मिळवणार असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, या सर्व घडामोडींविरोधात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – संजय राऊतांनी पत्रकारांच्या ‘त्या’ प्रश्नाला उत्तर देणं टाळलं, कारण काय?

शिंदे गटाचा उन्माद असाच सुरू राहणार आहे. आम्ही यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेलो याची वाट पाहायला कुठे तयार असणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच आम्ही याबाबत भूमिका घेणार आहे. सध्या वाद घालण्यात अर्थ नाही. परंतु कार्यालयाचा ताबा घेण्याआधी त्यांनी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेतली का? की घुसखोर म्हणून गेलेले आहेत? जर त्यांना परवानगी दिली नसेल तर त्यांनी केलेल्या घुसखोरीवर विधानसभा अध्यक्ष काय कारवाई करणार, असे सवाल खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केले.

“आम्ही विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतलेला नसून कार्यालयात प्रवेश केला आहे. त्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. हे शिवसेना पक्षाचं कार्यालय आहे आणि आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी केली आहे. कार्यालय ताब्यात घेण्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया भरत गोगावले यांनी पूर्ण केली आहे,” अशी प्रतिक्रिया आमदार सदा सरवणकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -