Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मोठी बातमी! दादर ते शिर्डी, पंढरपूर, नागपूर, कोल्हापूर विशेष गाड्या रद्द

मोठी बातमी! दादर ते शिर्डी, पंढरपूर, नागपूर, कोल्हापूर विशेष गाड्या रद्द

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहेत. यात गुरुवारी तब्बल ६० हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आहे. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. यात लांबपल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमधून कोरोना संसर्ग अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दादर ते शिर्डी, पंढरपूर, नागपूर, कोल्हापूर या विशेष गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ९ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत या विशेष रेल्वेगाड्या बंद असणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाने अधिकृत माहिती जाहीर केली आहे.

खालील विशेष गाड्या रद्द केल्या जातील. तपशील खाली दिल्यानुसार :

ट्रेन क्रमांक 01041 दादर – साईनगर शिर्डी विशेष, दि. १०.४.२०२१ ते २९.४.२०२१ पर्यंत प्रवासाला प्रारंभ (JCO ) करणारी.

- Advertisement -

ट्रेन क्रमांक 01042 साईनगर शिर्डी – दादर विशेष, दि. ११.४.२०२१ ते ३०.४.२०२१ पर्यंत प्रवासाला प्रारंभ (JCO ) करणारी.

ट्रेन क्रमांक 01027 दादर – पंढरपूर शिर्डी विशेष, दि. ९.४.२०२१ ते ३०.४.२०२१ पर्यंत प्रवासाला प्रारंभ (JCO ) करणारी.

- Advertisement -

ट्रेन क्रमांक 01028 पंढरपूर – दादर विशेष, दि. १०.४.२०२१ ते १.५.२०२१ पर्यंत प्रवासाला प्रारंभ (JCO ) करणारी.

ट्रेन क्रमांक 01403 नागपूर – श्रीछत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर विशेष, दि. १३.४.२०२१ ते २७.४.२०२१ पर्यंत प्रवासाला (JCO ) प्रारंभ करणारी.

ट्रेन क्रमांक 01404 श्रीछत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर – नागपूर विशेष, दि. १२.४.२०२१ ते २६.४.२०२१ पर्यंत प्रवासाला (JCO ) प्रारंभ करणारी.

वाढत्या कोरोनाबाबत रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

राज्यात वाढत्या कोरोनामुळे २०२० मध्ये अतिरिक्त रेल्वे गाड्यांची सेवा बंद होती. मात्र ऑक्टोबरनंतर संसर्ग कमी झाल्याने रेल्वे प्रशासनाने हळूहळू सेवा पूर्ववत केली. मात्र फेब्रुवारी २०२१ पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्याने रेल्वेने या काही विशेष रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे अशा आव्हानात्मक परिस्थितीत लांबपल्ल्याचा प्रवास करणे प्रवाशांनी टाळावे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे उन्हाळ्यात जास्त गाड्या चालवत असते. मात्र कोविड19 चा संसर्गमुळे फक्त कंफर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी दिली आहे. मात्र प्रवाशांना प्रवास करताना कोरोना नियमांचे कटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.


हेही वाचा- ..तर सर्वसामान्यांचा लोकल प्रवेश बंद – वडेट्टीवार


 

- Advertisement -