घरमहाराष्ट्रमोठी बातमी! शेतकऱ्यांचा ७० टक्के मागण्या मान्य, लाल वादळ मुंबईच्या दिशेने येणार?

मोठी बातमी! शेतकऱ्यांचा ७० टक्के मागण्या मान्य, लाल वादळ मुंबईच्या दिशेने येणार?

Subscribe

ठाणे- सरकारने शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केली असून या चर्चेत शेतकऱ्यांच्या ७० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे किसान लाँग मार्च स्थगित करत असल्याची घोषणा जे.पी.गावित यांनी आज वाशिंद येथे केली. स्थगित झाल्याची घोषणा केली असली तरीही मोर्चा मागे फिरणार ही नाही हे शेतकऱ्यांसोबत चर्चा करूनच ठरवलं जाईल असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

शेतमालाला रास्त भाव, शेतकर्‍यांना दिवसा १२ तास वीज आदी मागण्यांसाठी भारतीय किसान सभेने नाशिकहून मुंबईकडे शेतकर्‍यांचा लाँग मार्च काढला. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधान भवनात महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत आंदोलक शेतकर्‍यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन शेतकर्‍यांच्या मागण्या जवळपास मान्य करण्यात आल्या होत्या. याबाबत शुक्रवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत घोषणा करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार शिंदे यांनी विधानसभेत निवेदन केले. शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्याचे शिंदे यांनी सांगितले होते.

- Advertisement -

“दोन दिवसांपूर्वी सरकारसोबत शेतकरी शिष्टमंडळाने चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून ७० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. काही मागण्या एक महिन्याच्या मुदतीनंतर होणार आहेत. तर, काही मागण्या केंद्राच्या अख्यारित असल्याने समिती स्थापन करून केंद्रापर्यंत मागण्या पोहोचवण्यात येतील, असं आश्वासन सरकारने दिलं आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेले निवेदन शेतकऱ्यांना वाचून दाखवणार आहोत,” अशी प्रतिक्रिया जे.पी गावित म्हणाले. तसंच, सरकारने घेतलेल्या निर्णयावर मोर्चेकरी समाधानी असल्यांचही ते म्हणाले.

नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेले शेतकरी कालपासून वाशिंद येथे थांबले होते. सरकार मागण्या मान्य करत नाही तोवर येथेच थांबून राहणार, अन्यथा मुंबईच्या दिशेने येणार असा पवित्रा किसान सभेने घेतला होता. मात्र, सरकारने जारी केलेले निवेदन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी नेते जे.पी.गावित यांना दिले आहे. त्यानुसार, ७० टक्के मागण्या मान्य झाल्याने हा लाँग मार्च स्थगित करण्यता आला आहे. सरकारने जारी केलेले निवदेन शेतकऱ्यांना वाचून दाखवण्यात येणार असल्याची माहिती गावित यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, राज्य सरकारने आंदोलनस्थळी एसटी बसेस पाठवल्या आहेत. शेतकऱ्यांनी मोर्चा मागे घेतल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच या बसेसमधूनच हे शेतकरी आपल्या गावी परतणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -