घरमहाराष्ट्रनाशिकमोठी बातमी! पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सत्यजित तांबेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

मोठी बातमी! पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सत्यजित तांबेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Subscribe

Satyajit Tambe | सत्यजित तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते आहेत. त्यांचे वडील सुधीर तांबे यांना पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रसने उमेदवारी दिली होती.

Satyajeet Tambe | नाशिक – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे नाशिकची जागा काँग्रेसला मिळाली होती. काँग्रेसमधून सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, उमेदवारी अर्ज प्रक्रियेत ऐनवेळी सुधीर तांबे यांनी माघार घेत मुलगा सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र सत्यजित तांबे यांनी आता अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. या नाट्यमय घडामोडीत ते बिनविरोध निवडणून येण्याचीही शक्यता आहे.

अपक्ष उमेदवारी का?

- Advertisement -

सत्यजित तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते आहेत. त्यांचे वडील सुधीर तांबे यांना पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रसने उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. त्यामुळे सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यात आला. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे सत्यजित तांबेंनी दोन अर्ज भरले. त्यामुळे आता ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत, याबाबत सत्यजित तांबे यांनी माहिती दिली. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असला तरीही ते काँग्रेसचाच उमेदवार असणार आहे.

सत्यजित तांबेंची निवड का?

- Advertisement -

एबी फॉर्म सुधीर तांबेंच्या नावे निघाला असताना सत्यजित तांबेंना उमेदवारी का देण्यात आली असा प्रश्न पडला आहे. यावर सुधीर तांबेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. “राज्यात तरुण मुलं नेतृत्व करत आहेत त्यात एक दूरदृष्टी असलेलं युवानेतृत्व म्हणजे सत्यजीत तांबे आहेत. त्यांना वेगवेगळ्या विषयांचं सखोल ज्ञान आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं. त्यामुळे आम्ही सत्यजीत तांबे यांचा अर्ज भरला आहे. हा अर्ज महाविकासआघाडीच्या वतीने भरला आहे. फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरण्यात आला आहे. सत्यजित तांबेंच्या नावाला काँग्रेसमधील काही पक्षश्रेष्ठींनी विरोध केला असं नाही. कोणी विरोध केला असेल असं मला वाटत नाही. कारण आमच्या पक्षाचंही हे धोरण आहे की, तरुण लोक राजकारणात आली पाहिजेत. काँग्रेसने तरुणांना संधी देण्याचं मोठं काम केलं. शेवटच्या क्षणापर्यंत विचार सुरू असतात. त्यामुळे माझ्या नावाची घोषणा झालेली असतानाही सत्यजित तांबे यांचा अर्ज दाखल केला,” असं सुधीर तांबे म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -