Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे मोठी बातमी! पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी

मोठी बातमी! पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी

Subscribe

पुणे – पुण्यातील कोरेगाव पार्कमधील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी मिळाली होती. या धमकीच्या फोनमुळे परिसरात खळबळ माजली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ४५ वर्षीय व्यक्तीला हैद्राबादमधून ताब्यात घेतले आहे.

कोरेगाव पार्क येथील गुगल ऑफिसच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा एक फोन काल आला होता. त्यामुळे बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण इमाकतीची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांकडून सायबर तपासणी सुरू झाली. त्यानुसार, ज्याने फोन केला होता त्याला हैद्राबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत होते. त्यामुळे त्याने दारूच्या नशेतूनच कॉल केला होता. संबंधित व्यक्तीचा भाऊ पुण्यात राहत असून त्याला त्रास देण्याच्या उद्दीष्टाने त्याने ब्लॅकमेल केले. जेणेकरून त्याच्या भावाला त्रास होईल. मात्र, पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -