घरताज्या घडामोडीशिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर, बंडखोर आमदारांमध्ये खलबतं सुरु

शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर, बंडखोर आमदारांमध्ये खलबतं सुरु

Subscribe

नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना एकूण ४० आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच काही अपक्ष आमदार देखील आहे. शिंदे गटातील आमदारांची संख्या मोठी आहे. यामुळे भाजप सरकार स्थापन करण्यासाठी शिंदे गटाला मंत्रीपदाची ऑफर देत आहे.

महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या अस्थितरेतवर भाजपकडून मौन बाळगण्यात आले आहे. परंतु भाजपच्या गोटात चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरुच आहे. भाजपकडून आता शिंदे गटाला मोठी ऑफर देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी स्थापन झाले त्या पूर्वी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला होता. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हा अजित पवारांना जी ऑफर देण्यात आली होती. तीच ऑफर आता शिंदे गटाला देण्यात आली आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना आमदारांचा वाढता पाठिंबा पाहता भाजपकडून मोठी ऑफर देण्यात आली आहे.

नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना एकूण ४० आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच काही अपक्ष आमदार देखील आहे. शिंदे गटातील आमदारांची संख्या मोठी आहे. यामुळे भाजप सरकार स्थापन करण्यासाठी शिंदे गटाला मंत्रीपदाची ऑफर देत आहे. उपमुख्यमंत्रीपदासह १७ मंत्रिपद आणि ६ महामंडळ देणार असल्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळातील एकूण २५ टक्के खाती एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात एकूण ६ मंत्र्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

शिंदे गटात असलेल्या मंत्र्यांना पुन्हा नव्याने मंत्री मंडळात स्थान देण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्षांनाच याचा फायदा झाला असून शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला संपवण्याचा घाट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा असल्याचे शिंदे गटाने म्हटलं आहे. भाजपच्या ऑफरनंतर शिंदे गटाच्या बैठकांवर बैठका झाल्या आहेत. आज पुन्हा बैठक होणार असून या ऑफरवर खलबतं सुरु आहे. तसेच भाजपची देखील मुंबईतील सागर बंगल्यावर बैठक होत आहे. या बैठकीनंतर फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत.


हेही वाचा : शिंदे गटातील 15 बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफची टीम तैनात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -