व्यावसायिक महिलांना मोठा दिलासा, 25 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

Maharashtra Assembly Budget 2023 | सरकराने महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. तसंच, व्यवसाय करणाऱ्या महिलांना दिलासाही दिला आहे.

business women
प्रातिनिधिक छायाचित्र

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Assembly Budget 2023) सादर केला. अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असून ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित अर्थसंकल्प असल्याचं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. पंचामृत ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प 13,437 कोटी रुपयांचा आहे. या अर्थसंकल्पात महिलांसाठीही भरघोस मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महिलांना आता मासिक 25,000 रुपयांपर्यंतचे व्यावसायिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.

अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार, हिलांना आता मासिक 25,000 रुपयांपर्यंतचे व्यवसायिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी ही मर्यादा मासिक 10,000 रुपये होती, ती आता 25,000 रुपये करण्यात आली आहे. तसंच, दिव्यांग व्यक्तींच्या व्याख्याबदलामुळे असंख्य दिव्यांगांची व्यवसायकरातून सुटका होणार आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! ST प्रवासात महिलांना तिकीटदरात सरसकट ५० टक्के सूट

हवाई वाहतुकीला चालना, एटीएफ मूल्यवर्धित कर 18 टक्के अर्थकारणाला चालना

 • हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पाऊल
 • बृहन्मुंबई महापालिका, पुणे महापालिका आणि रायगड जिल्हा या तीन क्षेत्रात विमानचालन चक्की इंधनावरील (एटीएफ) मूल्यवर्धित कराचा दर 25 टक्क्यांहून आता 18 टक्के
 • असे करुन हा कर बंगळुरु आणि गोव्याच्या समकक्ष

महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना-2023 जाहीर

 • वस्तु व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना-2023 जाहीर
 • ही नवीन अभय योजना 1 मे 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत
 • दि. 1 मे 2023 रोजी प्रलंबित थकबाकीसाठी योजना लागू
 • कोणत्याही वर्षासाठी, व्यापार्‍याची थकबाकी 2 लाखांपर्यंत असल्यास ती रक्कम पूर्णपणे माफ, 1 लाख लहान व्यापार्‍यांना लाभ
 • कोणत्याही वैधानिक आदेशानुसार, थकबाकी 50 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 80 टक्के रक्कम माफ, सुमारे 80,000 मध्यम व्यापार्‍यांना लाभ

लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची… ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात

 • मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
 • पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
 • जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
 • पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
 • अकरावीत 8000 रुपये
 • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये

हेही वाचा – लेक लाडकी योजनेतून प्रत्येक मुलीला मिळणार लाखो रुपये, फडणवीसांची मोठी घोषणा