घरमहाराष्ट्ररविकांत तुपकरांना मोठा दिलासा, अटीशर्थींसह जामीन मंजूर; आंदोलनालाही यश

रविकांत तुपकरांना मोठा दिलासा, अटीशर्थींसह जामीन मंजूर; आंदोलनालाही यश

Subscribe

कापूस आणि सोबायीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी आत्मदहन आंदोलन केले होते. याप्रकरणी त्यांच्यासह २५ जणांना पोलिसांनी अटक केली होती. बुलडाणा दिवाणी न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असून त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. ते सध्या अकोला न्यायालयीन कोठडीत असून सायंकाळपर्यंत त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे.

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी रविकांत तुपकरांनी बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांना ताब्यात घेतले होते. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्या वाद झाला. त्यामुळे तुपकरांना बुलडाण्याहून अकोला कारागृहात हलवण्यात आले. तसंच, आत्मदहनावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यामुळे लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर अन्नत्याग करणार असल्याचे तुपकरांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, तुपकरांसह २५ सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. अखेर आज त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आत्मदहनाचा प्रयत्न आणि अन्नत्यागामुळे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश आले असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -