घरताज्या घडामोडी...तोपर्यंत पोलिसांच्या कुटुंबास पोलीस क्वार्टर्समध्ये राहता येणार

…तोपर्यंत पोलिसांच्या कुटुंबास पोलीस क्वार्टर्समध्ये राहता येणार

Subscribe

कोरोना संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना संबंधित पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत सरकारी निवासस्थानात वास्तव्य करता येणार असून तसा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या कोरोनाला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. तर या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या लढाईत कोरोना संसर्ग होऊन अनेक पोलीस योद्धांचा बळी गेला आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना संबंधित पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत सरकारी निवासस्थानात वास्तव्य करता येणार असून तसा निर्णय घेण्यात आला आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी आज सांगितले आहे.

५४ पोलिसांना गमवावे लागले प्राण

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावताना राज्यात ५४ पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसचे नियमानुसार पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना तीन महिन्यांमध्ये सरकारी निवासस्थान हे सोडावे लागते. याबाबत देशमुख म्हणाले ‘राज्यामध्ये ५४ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या पोलिसांच्या सेवानिवृत्तीच्या कालावधीपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना सरकारी निवासस्थानामध्ये राहता येणार आहे. याबाबतचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे’.

- Advertisement -

‘प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नागरिक विनाकारण फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका आणि पोलिस विभागाने प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवावेत’. तसेच करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

‘नागरिकांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यातून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे टाळेबंदीच्या काळात अनेक परप्रांतीय मजूर राज्याबाहेर गेले होते. ते परत राज्यात येत आहेत. याबाबत प्रशासनाने सतर्क राहून कार्यवाही करावी’ अशा सूचनाही देशमुख यांनी केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus Update: आज राज्यात सर्वाधिक ५,०२४ कोरोना रुग्णांची नोंद!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -