राणा दाम्पत्याला दिलासा; खार येथील घरावर पुढील आदेशापर्यंत BMC ला कारवाई न करण्याचे आदेश

आज न्यायालयाने राणा दाम्पत्याला एक महिन्यांची मुदत दिली आहे. तसेच पालिकेला पुढील आदेशापर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले.

big relief to the rana couple court directs bmc regarding house in khar
राणा दाम्पत्याला दिलासा; खार येथील घरावर पुढील आदेशापर्यंत BMC ला कारवाई न करण्याचे आदेश

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना दिंडोशी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने राणा दाम्पत्याला खार येथील घरासंदर्भात अर्ज करण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत कारवाई न करण्याच्या सुचनाही न्यायालयाने मुंबई महापालिकेला  (BMC)  दिल्या आहेत.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या खार येथील घराचं अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले होते. यानंतर दोघांनी न्यायालयाने धाव घेतली. दरम्यान आज न्यायालयाने राणा दाम्पत्याला एक महिन्यांची मुदत दिली आहे. तसेच पालिकेला पुढील आदेशापर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले.

नेमकं प्रकरण काय आहे?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या मुंबईतील (Mumbai) खार येथील घराचे बांधकाम अनधिकृत असल्याच्या अनेक तक्रारी मुंबई मनपाकडे आल्या होत्या. यावेळी इमारतीतील अनेक सदनिका मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करत पालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोप आणि तक्रारींनंतर मुंबई महापालिकेने तपासणीसाठी राणा दाम्पत्याला कलम 488 नुसार नोटीस बजावली, यानंतर मुंबई मनपाने राणा दाम्पत्याच्या घराची पाहणी सुद्धा केली होती.

Navneet Rana : राणा दाम्पत्याचे मुंबईतील घराचे बांधकाम अनधिकृतच, बीएमसीने पुन्हा बजावली नोटीस

मात्र, राणा दाम्पत्याने मुंबई मनपाला आपली बाजू मांडत उत्तर दिलं. परंतु त्यांनी दिलेलं उत्तर अमान्य असल्याचं बीएमसीने म्हटलं आहे. घरात करण्यात आलेल्या बांधकामात नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. हे अनधिकृत बांधकाम 7 ते 15 दिवसांमध्ये पाडावं नाही तर महापालिका यावर कारवाई करेल, असं मुंबई मनपाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर आता पालिकेला पुढील आदेशापर्यंत कोणतीही कारवाई करता येणार नाही.