घरताज्या घडामोडीपाठिंबा जाहीर करणाऱ्या मनोहर जोशींची ठाकरे कुटुंबीयांनी घेतली भेट

पाठिंबा जाहीर करणाऱ्या मनोहर जोशींची ठाकरे कुटुंबीयांनी घेतली भेट

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची आज भेट घेतली. काल मनोहर जोशी यांनी आपण ठाकरे गटासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब त्यांची भेट घेतली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची आज भेट घेतली. काल मनोहर जोशी यांनी आपण ठाकरे गटासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब त्यांची भेट घेतली. त्यामुळे आता मनोहर जोशींनी ठाकरे गटासोबत राहणार असल्याचे स्पष्ट करताच उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. (Big relief to Uddhav Thackeray Manohar Joshi remains with the Thackeray group)

मनोहर जोशी यांनी शुक्रवार २ डिसेंबर रोजी म्हणजेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपण कायम उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचे म्हटले. शिवाय, “मनोहर जोशी यांनी पहिल्यापासून शिवसेनेत असल्याचे म्हटले होते. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सातत्यानं उभा आहे. माझ रक्त शिवसेनेचे असून अगोदर बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास आणि आता उद्धव ठाकरेंचा सहवास, मी महाराष्ट्र आणि शिवसेनेसाठी आहे”, असे मनोहर जोशी यांनी म्हटले.

- Advertisement -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर सेनेच्या बड्या नेत्यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. या भेटींमुळं मनोहर जोशी काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर मनोहर जोशी यांनी काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचं जाहीर केले होते.

शिवसेनेत जून महिन्यात पक्षाच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. तर, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडली. नोव्हेंबर महिन्यात खासदार गजानन कीर्तिकर यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले मनोहर जोशी काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.

- Advertisement -

हेही वाचा – कुणी आडवे आल्यास तुडवा आणि पुढे जा; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -